नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याच्या गुन्हे अहवालाप्रमाणे फेबु्रवारी अखेर 7 खून वाढले आहेत. टक्केवारी मोजल्यानंतर हा आकडा 87 टक्के खून वाढले असा होतो. खून करण्याचा प्रयत्न या सदरात सुध्दा 9 गुन्ह्यांची वाढ आहे. टक्केवारीमध्ये हा आकडा 64 टक्के वाढतो. त्याशिवाय सन 2023 पासून आजपर्यंत 4 गुन्हे असे आहेत की, ज्यातील आरोपी अज्ञात आहेत. 2025 चा एक गुन्हा असाही आहे की, ज्या मयत आणि आरोपी दोन्ही अज्ञात आहेत.
नांदेड जिल्ह्याच्या गुन्हे अभिलेख दर महिन्याला तयार होत असतो. तो नांदेडमध्येच नव्हे तर राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात तयार होतो. यंदा फेबु्रवारी अखेरपर्यंत मागील वर्षाच्या तुलनेत सात खूनांची वाढ झाली आहे. त्यात एक खून काल परवाच घडलेला आहे. ज्यात एका युवकाचे जाळलेले प्रेत सापडलेले आहे. पण तो गुन्हा मार्चमध्ये घडलेला आहे. मागील वर्षी फेबु्रवारी अखेरपर्यंत आठ खून घडले होते. यंदा 15 घडले आहेत. यामध्ये एक खून असा आहे की, ज्यातील आरोपीही सापडले नाहीत आणि मरणाऱ्याची ओळख सुध्दा पटलेली नाही. हीे प्रेत हस्सापूर शिवारात पोत्यात भरून सापडले होते. खून करण्याचा प्रयत्न या प्रकारात 64 टक्के वाढ झाली आहे. 2024 या वर्षात असे 24 प्रकार घडले होते यंदाच्या त्यांची संख्या 23 अशी झाली आहे. यावरुन गुन्ह्यांचा अभिलेख हा वाढला असे म्हणावे लागेल. यात काही गुन्ह्यांची संख्या कमीही असेल पण खून करणे, आणि खूनाचा प्रयत्न करणे हे प्रकार भयंकर आहेत. यासोबत सन 2023 पासून काही गुन्ह्यांची उकल झाली नाही. ज्यामध्ये भोकर नदीच्या सुधा पात्रता एका व्यक्तीचे हात बांधून खून करण्यात आला होता. त्यात मयताचे नावही माहित नाही आणि आरोपींचेही नाही. सन 2024 मध्ये नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीच्या छातीत चाकू मारून खून करण्यात आला होता. ते आरोपी अद्याप सापडले नाहीत. सन 2024 मध्ये माहुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गर्भवती महिलेला जाळून टाकण्यात आले होते. त्याचाही शोध लागला नाही. नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाा 70 वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून करण्यात आला होता. पण त्या प्रकरणातील आरोपीची माहिती अद्याप लागलेली नाही.
अशा प्रकारे 2025 च्या सुरूवातीच्या काळातच नांदेड जिल्हा पोलीस दलाचा खून आणि खूनाचा प्रयत्न या सदरात वाढलेला आलेख धक्कादायक आहे. सोबतच 2023 पासून आजपर्यंत काही खून प्रकरणातील आरोपींची माहिती नाही आणि काही खून प्रकरणामध्ये मरणारेंचे नाव माहित नाही.
Leave a Reply