आरसीसीच्या सर्व शाखांमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन
मागील 24 वर्षांपासून प्रा.मोटेगावकर सरांचे आरसीसी हे शैक्षणिक कार्याबरोबरच विविध सामाजिक,धार्मिक कार्यक्रमांमध्येही सक्रिय सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये,सामाजिक बांधिलकी,सांस्कृतिक वारसा ई चे जतन व संवर्धन केले पाहिजे याची शिकवण देतो. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या RCC PATTERN च्यावतीने सर्व शाखांमध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात व सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान महिला शिक्षक, विद्यार्थीनी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
लातूर येथील नालंदा कॅम्पसमधील विशेष कार्यक्रमात 150 महिलांचा सन्मान करण्यात आला. तर इतर शाखेतही विविध कार्यक्रम आयोजित करून महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रा. शिवराज मोटेगावकर सर, सौ. मीनल मोटेगावकर मॅडम व संपूर्ण आरसीसी टीम उपस्थित होती. या विशेष प्रसंगी प्रा. मोटेगावकर सरांनी सर्व महिलांना शुभेच्छा देत, “ज्या घरामध्ये पत्नीचा, आईचा, बहिणीचा तसेच इतर स्त्रीयांचा सन्मान केला जातो त्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करते.” अशा शब्दांमध्ये त्यांनी स्त्रीचे महत्व समजावून सांगितले. त्याचबरोबर महिला सशक्तीकरण, शिक्षणातील त्यांचे योगदान आणि समाजातील महत्त्वाच्या भूमिकांवर सौ. मीनल मोटेगावकर यांनी आपले मत व्यक्त केले.
Leave a Reply