संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीचे फोटो समोर आल्यानंतर सपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय पक्षाच्या वजनदार नेत्यांकडून गुन्हेगारीला आणि गुंडगिरीला अनेकदा खतपाणी घातले जाते.पण, याचं प्रमाण प्रचंड वाढले आहे. अशा प्रकरणातील गुन्हे एकप्रकारे नक्षलवाद आणि दहशतवाद याप्रमाणे भयानक आहेत. फरक एवढाच येथे प्रशासन, पोलीस आणि नेते सगळेच फितूर झालेले असतात. हा नवा राजकीय दहशतवाद आहे. धनंजय मुंडे यांनी निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडला आजवर साथ दिली नसल्यानेच त्याचं धाडस झाले. त्यामुळे या प्रकरणासाठी ते तेवढेच जबाबदार आहेत. जर राजकीय नेते आणि पोलीस गुन्हेगारांना संघटितपणे साथ देत असतील तर त्यांच्यावर मकोका दाखल करावा.
#संतोषदेशमुख #बीड #marathi #santoshdeshmukh
Leave a Reply