नांदेड(प्रतिनिधी)-सायन्स ऑलिंपियाड फाऊंडेशन अंतर राष्ट्रीय गणित ऑलिंपियाड परिक्षेचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आला असून यात नांदेड शहरातील लिटल्स स्कॉलर्स पब्लिक स्कुलची विद्यार्थीनी कु.तेजसी बाचे या विद्यार्थीनीला गोल्ड मेडल प्राप्त झाले आहे.
अंतरराष्ट्रीय दर्जाच्या असणाऱ्या गणित ऑलिंपियाड परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परिक्षेत नांदेड शहरातील अनेक विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. यात लिटल्स स्कलॉलर्स पब्लिक स्कुल या शाळेतूनही अनेक विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली होती. मात्र यात इयत्ता पहिल्या वर्गातील तेजसी बाचे यांनी पहिल्याच प्रयत्नात गोल्ड मेडल मिळवल आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे संचालक रविंद्र रेड्डी, मुख्याध्यापिका उज्वला राणे, शिक्षिका संगिता मदनुरकर, स्नेहलता मेटकर, शिल्पा पिटलमकर, कल्पना चव्हाण, अश्र्विनी कुलकर्णी, मिरा काळबांडे, सविता कदम यासह अनेकांनी तिच्या या यशाबद्दल पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Leave a Reply