प्रयागराज येथील महाकुंबमेळ्यामध्ये दिसला शिक्षक- विद्यार्थ्याचा ऋणानुबंध
देशसेवेत कार्यरत असणारे अधिकारी डॉ. वैभव बडे (बीएसएफ) डेप्युटी कमांडंटनी परिधान केला प्रा.मोटेगावकर सरांच्या हस्ते पदोन्नतीचा बॅज
महाराष्ट्रासह देशाला डॉक्टर ,इंजिनियर देणारे सुप्रसिद्ध शिक्षक तथा आरसीसी क्लासेस चे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर सर आणि सौ.मिनल मोटेगावकर यांना 144 वर्षानंतर आलेल्या
महाकुंभमेळ्याला जाण्याचा योग आला .त्याप्रसंगी
वसंतपंचमीच्या शाही स्नानासाठी मित्रपरिवारासह महाकुंभमेळ्याला गेले असता या धार्मिक उत्सवामध्ये प्रा.मोटेगावकर सरांचे २०१३ बॅच चे विद्यार्थी डॉ.वैभव बडे यांची भेट झाली डॉ. बडे हे भारतीय लष्करात अधिकारी पदावर कार्यरत आहेत.त्यांनी मोटेगावकर सरला पाहताच गळाभेट घेतली.
जुन्या आठवणींना उजाळा दिला नंतर त्यांनी मोटेगावकर सर व मिनल मोटेगावकर मॅडम यांना शाही स्नानासाठी
व्हीआयपी घाटावर स्वतः घेऊन गेले .ही गुरुसाठी अविस्मरणीय घटना होती.या सर्व आदरतिथ्यामुळे मोटेगावकर सर भाराऊन गेले.
अगदी सोप्या भाषेत हसत खेळत केमिस्ट्री विषयासह जीवनातील व जगण्यातील गमक विद्यार्थ्यांना सांगणारे आणि शैक्षणिक माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे प्रा मोटेगावकर सर म्हणजे एक प्रेरणेचा झरा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही .याच कुंभमेळ्यातील कर्तव्यावर असणारे डॉ.वैभव बडे यांना नुकतीच असिस्टंट कमांडंट पदावरून डेप्युटी कमांडंट या पदावरती पदोन्नती झाल्याची बातमी समजली होती आपल्या गुरूच्या हस्ते पदोन्नतीचा बॅज मोटेगावकर सरांच्या हस्ते लावून घेण्याची परवानगी डॉ.वैभवने लष्करातील वरिष्ठ अधिकार्याकडून घेतली डॉ.बडेनी आपल्या गुरूच्या हस्ते खांद्यावर बॅज लावून घेतला व त्याप्रसंगी मोटेगावकर दाम्पत्यांनी डॉ.वैभव याना पुढील वाटचालीस शुभेच्छा व आशीर्वाद दिला. या कार्यक्रमाच्या वेळी कमांडंट मनोज सोनी सर,डेप्युटी कमांडंट रंजन कुमार, सहाय्यक कमांडंट डी आर मीना, द्वारकादास श्याम कुमार चे संचालक तुकाराम पाटील, दुर्गा पाटील, राजू पाटील उपस्थित होते. 23 वर्षाच्या इतिहासातील हा प्रथमच दुर्मिळ योग आहे की गुरुच्या हातून शिष्याला बढतीचा बॅज लावून सन्मान करण्यात आला .
असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.
तर गुरु-शिष्याचे नाते, शिष्यांचा सन्मान सत्कार, व त्यांनी घडवून आणलेला कुंभमेळ्यातील शाही स्नान हा तिहेरी संगम म्हणजे माझ्यासाठी शिष्यांनी मला दिलेली गुरुदक्षिणाच होय अशा शब्दात प्रा.मोटेगावकर सरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
तर ग्रामीण भागातून गरिबीशी दोन हात करत, जिद्दीने अभ्यासाच्या जोरावर डॉ. वैभव बडे यांनी महाराष्ट्रातील पहिल्या नीट परीक्षेत सर्वोत्तम गुण घेऊन सोलापूर येथून एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केले. तब्बल 11 वर्षानंतर देखील मोटेगावकर सरांनी अतिशय सोप्या पद्धतीने शिकवलेल्या केमिस्ट्री विषयातील ट्रिक्स आजही जशास -तशा मला आठवतात असे सांगितले आणि जुन्या आठवणीला उजाळा दिला या सर्वांचे श्रेय त्यांनी आपले गुरु प्रा.मोटेगावकर सर यांना देत आनंदाश्रुना वाट मोकळी करून दिली.सरांचाही कंठ दाटून आला.अशी ही गुरु-शिष्याची भेट व जगावेगळी गुरुदक्षिणा कायम स्मरणात राहील. असे उपस्थितांनी बोलून दाखवले.
Leave a Reply