विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी आज, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत ८१ मतदान केंद्रांवर मतदान होईल. यात २४ हजार ७३२ पुरुष आणि ११ हजार ७८ महिला असे एकूण ३५ हजार ८१० शिक्षक मतदार आपला हक्क बजावतील. २६ उमेदवार रिंगणात आहेत. यात किरण सरनाईक (शिवसेना), काँग्रेसच्या अदिती पोहरे-देशमुख, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दिलीप कडू, विजुक्टाचे अविनाश बोर्डे, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, शिक्षक आघाडीच्या संगीता शिंदे-बोंडे आणि चंद्रशेखर भोयर यांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक १० हजार ९७ मतदार आहेत. त्यांच्यासाठी २५ मतदान केंद्रे असून, शहरात ५ ठिकाणी ११ केंद्रे उभारली आहेत. मावळत्या आमदारांचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपत असल्याने ही निवडणूक होत आहे. मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता विद्यापीठ रोडवरील लोकशाही भवनात सुरू होईल. मतमोजणीसाठीचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search