कंधार (प्रतिनिधी)
यश कोचिंग क्लासेस कंधारच्या वतीनं नवोदयच्या गुणवंत विद्यार्थ्यांनचा गुण गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी शंतनु कैलासे यांनी या वर्षीच्या विद्यार्थ्यांचे गुण म्हणजे यश नाही तर यश ज्ञान मिळवून देते.असे प्रतिपादन कंधारच्या यश कोचिंग क्लासेसच्या वतीने प्रियदर्शनी नगर, येथे नवोदय परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधत होते.
यश कोचिंग क्लासेसच्या वतीनं नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा मध्ये उत्तीर्ण झालेल्या 28 विध्यार्थीनी गुण प्राप्त केले अशा विद्यार्थ्यांचे क्लासेसच्या वतीनं गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी व शिक्षक यामधला अंतर दूर करत कैलासे म्हणतात कि,विद्यार्थीने मोठ मोठी स्वप्ने पाहावीत, नुसते गुण मिळवने यश नसून पुढील उच्च शिक्षणाचे शिखर चढले पाहिजे. साधारण गरीब व सामान्य कुटुंबाच्या घरात जन्म घेऊन आज अनेक विद्यार्थी मोठ मोठ्या पदावर कार्यरत असल्याचे सांगत विद्यार्थ्यांत एक नवी दिशा देण्याची ऊर्जा त्यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रो अॅड ग्लो पब्लिक स्कूलचे संचालक शंतनु कैलासे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मेडिशिन सर्जन डॉ.ज्ञानेश्वर केंद्रे,नगरेश्वर शाळेचे मुख्याध्यापक बसवेश्वर मंगनाळे, सहशिक्षक अशोक झडते, प्रशांत कलमे, मोबीन शेख आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर दिपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 28 गुणवंतांचा सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले.याप्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना कैलासे पुढे म्हणाले की,पुढील शिक्षणाचा विचार विद्यार्थीन समोर ठेवत मुलींनी सावित्रीबाई फुलेंचा वसा घ्यावा. मुलामुलींनी एकमेकास गुणांची चर्चा करावी व समजत उमजत नसेल तर गुरुजनांचा आधार घ्यावा अशा प्रास्ताविक यश कोचिंग क्लासेचे संचालक नितीन जोंधळे यांनी केलं.
गुगुण मिळविणे म्हणजे यश नाही – शंतनु कैलासे
