डॉ. आंबेडकर नगर भीम जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी सिद्धोधन  सावंत 


नांदेड (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकर नगर येथे सार्वजनिक भीम जयंती मंडळाची बैठक उत्साहात पार पडली. ही बैठक नगरसेवक सत्यपाल सावंत आणि नगरसेवक राहुल सोनसळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अशोक कांबळे होते.

या बैठकीत आगामी भीम जयंती उत्सव मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध आणि समाजोपयोगी उपक्रमांसह साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नवीन कार्यकारिणीनुसार अध्यक्षपदी सिद्धोधन सावंत, उपाध्यक्षपदी अभिजीत गायकवाड, कोषाध्यक्षपदी सुभाष कांबळे, सचिवपदी संदेश मोरे तर संघटकपदी देवानंद मोगले यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून शादु लोणे यांची निवड झाली आहे. मंडळाचे सल्लागार म्हणून ईश्वर सावंत, अशोक कांबळे, चंद्रकांत कांबळे, सुभाष गजभारे आणि किशोर हटकर यांची नियुक्ती करण्यात आली.

या बैठकीला वार्डातील अनेक ज्येष्ठ नागरिक तसेच तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सर्वांच्या सहमतीने ही कार्यकारिणी निवडण्यात आली. यावेळी भीम जयंती उत्सव समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा आणि आदर्श पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले.


Post Views: 141






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *