पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये शासनाने सोमवारी ता. १२ कर्जमुक्तीसाठी पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहिर केली आहे. यामध्ये मराठवाडयातील २.०६ लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये नांदेड जिल्हयातील सर्वात जास्त ५१ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर सर्वात कमी ५ हजार लातुर जिल्हयातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. आता या शेतकऱ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना जाहिर केली आहे. या योजनेमध्ये सन १ एप्रील २०१९ ते ता. ३१ मार्च २०२५ या कालावाघधीत कर्ज वितरीत झालेल्या तसेच ता. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत कर्जथकीत असलेल्या व ता. ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या पिककर्ज, पुनर्गठीत तसेच फेरपुनर्गठीत कर्जाला दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याचे जाहिर केले होते. त्यानुसार शासनाने ता. २७ जुलै रोजी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहिर केली होती . यामध्ये मराठवाड्यातील १.३० लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना तातडीने आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ई केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान, शासनाने शुक्रवारी ता. ११ सप्टेंबर रोजी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील दुसरी यादी जाहिर केली आहे. यामध्ये मराठवाड्यातील १.९५ लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. सदरील याद्या ग्रामपंचायत कार्यालय तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, सहाय्यक निबंधक तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालयात प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता सोमवारी ता. १२ शासनाने तिसरी यादी जाहिर केली असून यामध्ये मराठवाड्यातील २.०६ लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. तीनही याद्यामधून मराठवाडयातील ५.३१ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. तिसऱ्या यादीतील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार आहे. मराठवाड्यातील २.०६ लाख शेतकऱ्यांचा समावेश शासनाने जाहिर केलेल्या यादीनुसार मराठवाड्यातील २.०६ लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये बीड जिल्हयातील सर्वात जास्त नांदेड जिल्ह्यातील ५१७२५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शिवाय छत्रपती संभाजीनगर जिल्हयात १९१४० शेतकरी, बीड ४७८२७, धाराशिव १३७००, हिंगोली १७४४३, जालना २१८७३, लातुर ५१४८, परभणी जिल्हयातील २९५९४४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. ई केवायसी करून घ्यावी- सुरेखा फुपाटे, जिल्हा उपनिबंधक या योजनेत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन त्वरित ई-केवायसी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. तसेच, ज्या पात्र शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी त्वरित फार्मर आयडी काढण्याची प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा योजनेचा लाभ मिळणार नाही. यादीतील जे पात्र शेतकरी मृत पावले आहेत, त्यांच्या वारसांनी देखील ७/१२ वर नोंद करून घेणे आणि फार्मर आयडी काढणे या अनिवार्य आहे. शेतकऱ्यांना तक्रार दाखल करता येणार सदर यादीतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम, आधार प्रमाणीकरण किंवा फार्मर आयडीबाबत काही तक्रार अथवा शंका असल्यास, ते शेतकरी ऑनलाइन स्वरूपात flrs.maharashtra.gov.in या पोर्टलवर त्यांची तक्रार दाखल करता येणार आहे.
मराठवाड्यातील 2.06 लाख शेतकऱ्यांना तिसऱ्या यादीत कर्जमुक्ती:नांदेड जिल्हयातील 51 हजार शेतकऱ्यांचा समावेश