CISF Jawan Catches Suspect at Jama Masjid Metro; Gold Powder Seized

देश-विदेश

[ads1]

नवी दिल्ली50 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

दिल्लीच्या जामा मशिद मेट्रो स्थानकावर संशयास्पद बॅग घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला CISF जवानांनी तात्काळ पकडले. ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. घटना 17 ऑक्टोबरची असून, तिची माहिती आज समोर आली आहे.

CCTV फुटेजमध्ये दिसत आहे की, व्यक्ती मेट्रो स्थानकाच्या सुरक्षा तपासणी क्षेत्रात पोहोचून आपली बॅग एक्स-रे स्कॅनिंगसाठी ठेवतो. स्कॅनिंगदरम्यान बॅगेत एक संशयास्पद आणि दाट वस्तू दिसून आली. तपासणीत सोन्यासारखी पावडर आढळली.

यानंतर व्यक्ती फोनवर बोलत महिलांच्या सुरक्षा स्कॅनिंग क्षेत्राकडे जातो. त्या वेळी तेथे एकही महिला प्रवासी नव्हती.

अचानक व्यक्ती काळी बॅकपॅक घेऊन पळू लागतो. तो महिलांच्या फ्रिस्किंग क्षेत्रातून एस्केलेटरच्या दिशेने धावतो. CISF जवानाने 8 सेकंदांत पायऱ्या चढून एक्झिट गेट क्रमांक-1 वर त्या व्यक्तीला पकडले.

5 छायाचित्रांमध्ये संपूर्ण घटनाक्रम…

आरोपी बॅग स्कॅनिंगसाठी मशीनमध्ये ठेवतो. त्यानंतर पुढे जातो.

आरोपी बॅग स्कॅनिंगसाठी मशीनमध्ये ठेवतो. त्यानंतर पुढे जातो.

फोनचा बहाणा करून दुसऱ्या तपासणी गेटवर जातो आणि बाहेर पळू लागतो.

फोनचा बहाणा करून दुसऱ्या तपासणी गेटवर जातो आणि बाहेर पळू लागतो.

एका बाजूला CISF जवान पायऱ्यांवर चढतो, तर दुसऱ्या बाजूला आरोपी शेजारी असलेल्या एस्केलेटरने वर चढतो.

एका बाजूला CISF जवान पायऱ्यांवर चढतो, तर दुसऱ्या बाजूला आरोपी शेजारी असलेल्या एस्केलेटरने वर चढतो.

जामा मशिदी मेट्रो गेट क्रमांक 1 समोर जवान आधी पोहोचून आरोपीला पकडतो.

जामा मशिदी मेट्रो गेट क्रमांक 1 समोर जवान आधी पोहोचून आरोपीला पकडतो.

तोपर्यंत दुसरा जवानही येतो. दोघे आरोपीला पकडून खाली आणतात.

तोपर्यंत दुसरा जवानही येतो. दोघे आरोपीला पकडून खाली आणतात.

दिल्ली पोलिसांनी सांगितले- आरोपी मलेशियातील टेक्सटाइल क्षेत्रात काम करतो

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, 17 ऑक्टोबर रोजी CISF कर्मचाऱ्यांनी मो. शोएब नावाच्या व्यक्तीला त्यांच्या ताब्यात दिले. तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. त्याने आपला दुसरा पत्ता क्वालालंपूर, मलेशिया असा सांगितला.

चौकशीत आरोपीने सांगितले की, तो मलेशियात राहतो आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करतो. त्याची पत्नी मलेशियाची नागरिक असून त्यांची दोन्ही मुलेही मलेशियाचे नागरिक आहेत.

तो १६ ऑक्टोबर रोजी हे पावडर घेऊन दिल्लीला आला होता आणि जामा मशिद परिसरातील वसीर नावाच्या हॉटेलमध्ये थांबला होता. घटनेच्या दिवशी तो जामा मशिद मेट्रो स्थानकावरून लाजपत नगरला जाण्यासाठी पोहोचला होता. तेथे तपासणीदरम्यान CISF कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले.

पोलिसांना संशय होता की, जप्त केलेला पदार्थ अंमली किंवा सायकोट्रॉपिक पदार्थ असू शकतो. त्यानंतर संबंधित नार्कोटिक्स विभागाशी संपर्क साधण्यात आला आणि पदार्थाची तपासणी करण्यात आली. तपासणीत जप्त केलेले सोन्यासारखे दिसणारे पावडर अमली पदार्थ नसल्याचे स्पष्ट झाले.

[ads2]

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry