रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कर्जत-खालापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे यांनी केला आहे. या धमकीमुळे आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत संतोष बैलमारे यांनी थेट खालापूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून, सत्ताधारी आघाडीतील नेत्यांमधील या थेट संघर्षामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रोजगारावरून श्रेयवाद रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील सावरोली येथे एल अँड टी (LT) ही कंपनी कार्यरत आहे. या कंपनीमध्ये परिसरातील स्थानिक तरुणांना नोकरी आणि रोजगार मिळवून देण्यावरून आमदार महेंद्र थोरवे आणि संतोष बैलमारे यांच्यात मागील काही दिवसांपासून श्रेयवाद सुरू होता. याच वादातून हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या मुद्यावरून सुरू झालेल्या या वादातून आमदार थोरवे यांनी आपल्याला गंभीर परिणामांची आणि जिवाचे बरे-वाईट करण्याची धमकी दिल्याचा दावा बैलमारे यांनी केला आहे. या गंभीर प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने विशेष लक्ष घालून कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. जुना राजकीय संघर्ष कर्जत-खालापूर मतदारसंघामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वर्चस्वाची लढाई आणि अंतर्गत मतभेद आधीपासूनच आहेत. यापूर्वीही आमदार थोरवे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यात राजकीय वाद रंगला होता. रायगडमधील कंपन्यांना तटकरे ब्लॅकमेल करून त्रास देतात, असा आरोप थोरवे यांनी केला होता. तसेच, स्थानिकांना रोजगार देणाऱ्या कंपन्या कोणी बंद पाडल्यास त्याला जशास तसे उत्तर देण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आधीच तणाव असताना, आता थेट आमदारावरच जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. आता खालापूर पोलिस या तक्रारीची दखल घेऊन नेमकी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांच्या या कारवाईवरच रायगडमधील महायुतीचे पुढील भवितव्य अवलंबून असणार आहे.
रायगडमध्ये महायुतीत राडा!:आमदार महेंद्र थोरवेंकडून जिवे मारण्याची धमकी, राष्ट्रवादीच्या नेत्याची पोलिसांत धाव; काय आहे प्रकरण?