पायी जाणाऱ्या युवकाला दुचाकीची धडक, जागीच मृत्यू:मोर्शीजवळ पाळा-सालबर्डी मार्गावर घडली घटना, दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी




मोर्शीजवळ पाळा-सालबर्डी मार्गावर एका दुचाकीने पायी जाणाऱ्या युवकाला धडक दिली. या घटनेत ३५ वर्षीय विष्णू हरिभाऊ अंभोरे (रा. पाळा) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (१४ ऑक्टोबर) सायंकाळी ७.३० वाजता घडली. विष्णू अंभोरे पायी जात असताना, सालबर्डीहून मोर्शीकडे येणाऱ्या MH 27 DC 3035 क्रमांकाच्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. दुचाकीवर अनुराग कुमरे (३०) आणि संजय धुर्वे (२१) हे दोघे (रा. गिट्टीखदान, मोर्शी) होते. या धडकेत दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. मोर्शी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *