[ads1]
- Marathi News
- National
- Murder Committed During Facebook Live Against Drug Abuse, Murder Committed By Drug Dealer In A Crowded Market
चंदीगड21 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

पंजाबच्या मानसा येथे मंगळवारी नशाखोरीविरुद्ध आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते परविंदरसिंग ऊर्फ झोटा यांची भरबाजारात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याचा आरोप मेडिकल स्टोअरचा मालक अश्वनी याच्यावर आहे.
प्रत्यक्षदर्शींनुसार, झोटा हे गेल्या अनेक दिवसांपासून शहरात होत असलेल्या अमली पदार्थांच्या विक्रीला विरोध करत होते. मंगळवारी सकाळी ते नशेच्या गोळ्या खरेदी करणाऱ्या एका व्यक्तीला सोबत घेऊन गर्ग मेडिकल स्टोअरमध्ये पोहोचले. तेथे त्यांची संचालक अश्वनी कुमार याच्याशी बाचाबाची झाली. झोटा यांनी फेसबुक लाइव्ह करत अमली पदार्थ विकल्याचा आरोप केला आणि कारवाई करण्याचा इशारा दिला. याचदरम्यान अश्वनीने पिस्तूल काढले, तेव्हा झोटा म्हणाले, ‘चालव, आमच्यावर गोळी चालव.’ यादरम्यान बाचाबाचीनंतर दुकानदाराने गोळीबार केला.
जुना वाद: ३ वर्षांपूर्वी आरोपीच्या गळ्यात घातली बुटांची माळ
- हत्येचे व कारण मेडिकल स्टोअर संचालक अश्वनी कुमार व झोटा यांच्यातील जुने वैमनस्य असल्याचे सांगितले जात आहे. झोटा यांनी १३ जुलै २०२३ रोजी याच मेडिकल स्टोअर संचालकाला
- ड्रग्ज विकताना पकडले होते. मेडिकल स्टोअर संचालक एका विद्यार्थ्याकडून ड्रग्जचा पुरवठा करून घेत असल्याचा आरोप होता. यावरून झोटा यांनी स्टोअर संचालकाच्या गळ्यात बुटांचा हार घालून त्याला बाजारात फिरवले होते.
पोलिसांनी अश्वनीवर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. दुसरीकडे, याप्रकरणी लोकांनी कृती समिती स्थापन करून १५ तारखेला पंजाब बंदची हाक दिली आहे. समितीने मुख्यमंत्री व डीजीपींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
[ads2]
