भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर घडवून आणलेल्या ऐतिहासिक धम्मक्रांतीच्या स्मरणार्थ नांदेडमध्ये ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त बजरंग बुद्ध-भीम गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, सामाजिक परिवर्तन, समता, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठेचा संदेश जनमानसात पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आजही प्रेरणादायी आहे. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देणे, सामाजिक बांधिलकी जपणे आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे, हा या पुरस्कारामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. विशाल कोकरे यांनी आरोग्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करताना समाजातील इतर व्यक्तींनाही सामाजिक सेवेची प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या पुरस्कार सोहळ्यास विशाल कोकरे यांनी सपत्नीक तसेच संपूर्ण सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ऐतिहासिक महत्त्वाचे स्मरण करावे, असेही आयोजकांनी म्हटले आहे. माँ जिजाऊ महिला सक्षमीकरण विकास केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सहआयोजक हिंगोले चंद्रशेखर यांनी पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती दिली.

Post Views: 300
