‘सप्तशृंगी गडावर आई तुझा वास…’ आणि ‘कानबाई गं तुना रथ चालना…’ या भक्तिगीतांच्या सुरांनी जायखेडा बाजारपेठेत नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला भक्तिरंग चढला. सप्तशृंगी मातेचा महिमा सांगणारी गीते आणि अहिराणी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या कानबाई मातेची प
.
पिंपळादेवी नवरात्र उत्सव मित्र मंडळ व सामाजिक कार्यकर्ते कैलास अहिरे यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्याला शेकडो महिला व पुरुष भाविकांनी उपस्थिती लावली. जायखेडा बाजारपेठ परिसरात सोमवारी (दि. १२) या विशेष धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते कैलास अहिरे यांनी आपले सुपुत्र स्व. भावेश अहिरे व भाऊजाई स्व. स्व. रंजना अहिरे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या आठवणी जतन करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले होते.या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सामाजिक कार्यकर्ते कैलास अहिरे यांच्यासह पिंपळादेवी नवरात्र उत्सव मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले
या सोहळ्यात प्रसिद्ध गायक कुणाल पवार व त्यांच्या साथीदारांनी ‘गडावरी भवानी…’, ‘प्रथम तुला वंदितो…’ यांसारखी सप्तशृंगी मातेचा महिमा सांगणारी गीते, तसेच अहिराणी संस्कृतीचे प्रतीक असलेली कानबाई मातेची पारंपरिक लोकगीते व भक्तिगीते सादर केली. ढोलकीच्या ठेक्यावर रंगलेल्या या सुरेल मैफिलीने उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले. जायखेडा शहरासह परिसरातील शेकडो महिला व पुरुष भाविकांनी भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घेतला. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठेमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
