
आम्ही संविधान आणि लोकशाही वाचवण्याच्या भूमिकेत आहोत आणि आमच्याकडे त्यासाठी भक्कम पुरावे आहेत. स्वर्गीय राजीव गांधी यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या स्वायत्ततेचा आज चुकीचा अर्थ लावला जात आहे. देशात अराजकता माजवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत असून, आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी त्यांच्याविरोधात लढा देत आहोत. आमची भूमिका सर्वांनी ऐकून घेतली पाहिजे. आज नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही व्यवस्थेविरोधात आणि लोकशाहीच्या हत्येविरोधात देशातील जनता रस्त्यावर उतरली आहे, असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे.
नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर तब्बल 46 लाख मते वाढली. मतदानाच्या दिवशी दर दोन तासांनी मतदानाची टक्केवारी देशातील जनतेला सांगणे बंधनकारक असताना, ती सांगितली गेली नाही. संध्याकाळी 5 नंतर झालेले मतदान किती, हे गुपित ठेवले गेले आणि दुसऱ्या दिवशी थेट दुपारी 3 वाजता 10 टक्के मतदान अचानक वाढवून दाखवण्यात आले. आम्ही त्याचे सीसीटीव्ही फुटेज मागितले, कारण तो आमचा अधिकार होता; परंतु निवडणूक आयोगाने फुटेज दिले नाही आणि उलट कायदाच बदलून टाकला.
..म्हणूनच ते विरोधकांना भेटण्याचे टाळताय
नाना पटोले म्हणाले की, चोरी दाढीमध्ये तिनका अशी आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणूनच आमच्या भेटी टाळत आहेत, कारण त्यांना या सर्व गोष्टींची जाणीव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावाखाली हे लोक काम करत आहेत, म्हणूनच ते विरोधकांना भेटण्याचे टाळत आहेत.
ज्ञानेशकुमार यांच्याकडून लोकशाहीची हत्या
नाना पटोले म्हणाले की, ज्ञानेशकुमार यांनी 32 कोटी मते कमी करण्याचे पाप केले आहे. त्यांच्या माध्यमातून देशात लोकशाहीची हत्या करण्याचे सत्र सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या देखील ही बाब लक्षात आली आणि त्यांनी स्पष्ट केले की असे निर्देश आम्ही दिले नव्हते. या सगळ्यामागे मोदी आणि आरएसएसचा दबाव आहे का? सत्ताधाऱ्यांकडून सध्या दबावाचे राजकारण सुरू आहे. आता यांना कुठेतरी थांबवले पाहिजे आणि देशाला वाचवले पाहिजे, हीच आमची ठाम भूमिका आहे.
हे ही वृत्त वाचा
पहिल्याच निवडणुकीत 28 लाख नावे वगळली होती:ज्ञानेश कुमार यांच्यावरून गदारोळ का, मागील निवडणूक आयुक्तांचे सरकारशी संबंध कसे राहिले

‘ज्ञानेश ब्रो, राजीनामा द्या!’
हे स्लोगन गेल्या आठवड्यात तुम्ही खूपदा ऐकले असेल. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार सध्या टीकेच्या केंद्रस्थानी आहेत. मात्र, हे पद पहिल्यांदाच चर्चेत आलेले नाही. गेल्या 75 वर्षांत 26 CEC नियुक्त झाले आहेत. या काळात निवडणूक आयोगाचा प्रवास कसा राहिला आहे,
