Mitkari Demands Airport CCTV Footage for Ajit Pawar Accident; Maharashtra Seeks Proof


सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा अजित पवारांच्या अपघाती निधनावर संशय व्यक्त केला आहे. आम्हाला अजित पवार यांच्या अपघाती निधनासंबंधी थातूर मातूर चौकशी अहवाल नको आहे. या प्रकरणी ते विमानतळावर आल्यापासून विमा

.

अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळालगत झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले. तेव्हापासून त्यांच्या अकाली निधनाविषयी वेगवेगळ्या अटकळी व्यक्त करण्यात येत आहेत. आमदार अमोल मिटकरी यांनीही अजित पवारांच्या निधनाच्या पहिल्या दिवसापासून या प्रकरणी संशय व्यक्त केला आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी विमान कोसळण्यापूर्वी त्यातून कुणीतरी निळी पॅन्ट घातलेला एक व्यक्ती विमानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता असा दावा केला होता. यामुळे एकच खळबळ माजली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी या अपघाताच्या डीजीसीए चौकशीवर संशय व्यक्त केला आहे.

थातूर – मातूर चौकशी अहवाल नको

अमोल मिटकरी आज आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, आदरणीय दादांच्या विमान अपघाताचा थातुर मातुर चौकशी अहवाल यायला सुरुवात झाली आहे.दादा इतकी सामान्य व्यक्ती नव्हती,अहवाल सांगेल तांत्रिक चुक होती व वैमानिकाचा अंदाज चुकला,व जनता मान्य करेल! महाराष्ट्र पुरावा मागतोय. DGCA नी विमानतळावरील CCTV फुटेज प्रसारित करून दादाच्या आगमनापासून विमानात बसेपर्यंत प्रत्यक्षदर्शी पुरावा सादर करावा.

डीजीसीए ऐवजी यूजीसीए असा चुकीचा उल्लेख

उल्लेखनीय बाब म्हणजे अमोल मिटकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये डीजीसीए ऐवजी यूजीसीए असा उल्लेख केला. तसेच आपले ट्विट यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगालाही टॅग केले. यूजीसी व डीजीसीएच्या नाम साधर्म्यामुळे त्यांच्याकडून ही चूक झाली. त्यांच्या पोस्टखाली प्रतिक्रिया देणाऱ्या अनेकांनी त्यांची ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली.

अंजली दमानियांचा केला निषेध

दरम्यान, अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या निधनाविषयी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या एका विधानाचाही तिखट शब्दांत निषेध केला आहे. अंजली दमानिया यांनी दुःखाच्या क्षणी केलेली विधाने अत्यंत दुर्दैवी आणि असंवेदनशील आहेत. अजितदादांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असताना, माध्यमांशी संवाद साधताना जाणीवपूर्वक संशय निर्माण करणे हा केवळ राजकीय हेतूने प्रेरित प्रयत्न आहे. या कठीण आणि भावनिक काळात शब्दांचा विपर्यास करून वातावरण दूषित करण्याऐवजी, दुःखात सहभागी होणे अपेक्षित होते.

तथ्यांशिवाय आरोप करणे हे ना माणुसकीला शोभतं, ना जबाबदार सार्वजनिक भूमिकेला. अंजली दमानिया आपल्या असंवेदनशिलतेचा निषेध व धिक्कार, असे ते म्हणाले होते. अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या निधनाविषयी त्यांच्या कुटुंबातीलच एका सदस्यासह त्यांच्या पक्षातील एका बड्या नेत्यावर संशय व्यक्त केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *