नांदेडमध्ये खाकीची ३० किमी अंतरावरून विशेष सेवा! असर्जन चौकात वाळू माफियांकडून पोलिसाची धुलाई 


भरदुपारी हायव्होल्टेज ड्रामा

नांदेड (प्रतिनिधी) –  नांदेड जिल्ह्यात सध्या एका पोलिसाच्या अफाट कर्तव्यदक्षतेची आणि वाळू माफियांशी असलेल्या विशेष आपुलकीची खमंग चर्चा रंगली आहे. मूळ नियुक्ती नांदेड शहरापासून तब्बल ३० किलोमीटर अंतरावरील पोलीस ठाण्यात असतानाही, हे पोलीस महाशय थेट नांदेड ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत कशासाठी हजेरी लावत होते, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास असर्जन चौकात वाळू माफियांनी या पोलिसाला चांगलाच चोप दिल्याची चटका लावणारी घटना घडली असंअसल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे.

३० किलोमीटर दूर नियुक्ती, पण माया मात्र नांदेड ग्रामीणमध्ये!

या पोलीस महाशयांचा सेवाप्रवास तसा रंजकच राहिला आहे. आधी हे साहेब शहरापासून ४० किलोमीटर दूर कार्यरत होते. नंतर हळूहळू शहराच्या १४ किलोमीटरवर आले आणि सध्या त्यांची रीतसर नियुक्ती नांदेड शहरापासून ३० किलोमीटर दूर असलेल्या पोलीस ठाण्यात आहे. परंतु, स्वतःचे पोलीस ठाणे सोडून नांदेड ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील असर्जन चौकात हे महाशय भरदुपारी काय करत होते, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार, हे साहेब पहिल्यांदा जेव्हा नांदेडमध्ये आले होते, तेव्हा ते जे खास काम करत होते, तेच काम आजही अतिशय निष्ठेने करत आहेत. आणि हे काम दुसरं तिसरं काही नसून थेट वाळू माफियांशी संबंधित आहे!

असर्जन चौकात धुलाई कार्यक्रम आणि असंख्य प्रत्यक्षदर्शी!

वाळू माफियांशी संवाद साधण्यासाठी स्वतःची हद्द ओलांडून आलेल्या या पोलिसाला अखेर त्याच वाळू माफियांनी चांगलाच प्रसाद दिला. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास असर्जन चौकात असंख्य लोकांच्या डोळ्यांदेखत वाळू माफियांनी या पोलिसाला धोपटले. भरचौकात घडलेला हा अत्यंत लज्जास्पद प्रसंग शेकडो नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिला.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात खाकीची धुलाई कैद?

ज्या असर्जन चौकात हा हायव्होल्टेज ड्रामा घडला, तिथे अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. त्यामुळे या पोलिसाची वाळू माफियांनी केलेली ही खास सोय आणि भरचौकातील धुलाई नक्कीच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असणार, यात शंका नाही.आपल्या पोलीस ठाण्याची हद्द सोडण्याची नोंद केली किंवा कसे हे कळायला काही मार्ग नाही. कारण या नोंदीला सर्वोच न्यायालयाने बायबल ओळी असा उल्लेख केलेला आहे. आज तर वेळ सुद्धा बदलणे सीसीटीएनएस मुळे अवघड झालेले आहे.

शहरभरात चवीने चर्चा!

आपली हद्द सोडून ३० किलोमीटरवरून धावत येणे, वाळू माफियांशी संधान बांधणे आणि शेवटी त्यांच्याकडूनच मार खाणे, या संपूर्ण प्रकरणामुळे सध्या संपूर्ण नांदेड शहरात आणि पोलीस वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

 


Post Views: 38










Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *