नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा पोलीस दलातील ५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील सुधारीत तरतुदींनुसार ६ ऑक्टोबर २०२६ रोजी हे बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.या मध्ये अत्यंत दबंग पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांना नांदेड जिल्हा सांभाळण्यासाठी नियंत्रण कक्षात बोलवण्यात आले आहे.तर नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे सांभाळ्यासाठी मागे अर्धापूर पोलीस ठाणे गाजवणारे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
बदली झालेले पोलीस निरीक्षक
- सुभाष पांडुरंग उन्हाळे (पोलीस निरीक्षक):
- पूर्वीची नेमणूक: विमानतळ सुरक्षा, नांदेड
- बदलीचे नवीन ठिकाण: पोलीस ठाणे नायगाव
- ओमकांत आनंदराव चिंचोळकर (पोलीस निरीक्षक):
- पूर्वीची नेमणूक: पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण
- बदलीचे नवीन ठिकाण: पोलीस नियंत्रण कक्ष, नांदेड
- अमोल हरिदास भगत (पोलीस निरीक्षक):
- पूर्वीची नेमणूक: पोलीस ठाणे नायगाव
- बदलीचे नवीन ठिकाण: पोलीस ठाणे अर्धापूर
- महादेव हणमंतराव मांजरकर (पोलीस निरीक्षक):
- पूर्वीची नेमणूक: पोलीस ठाणे अर्धापूर
- बदलीचे नवीन ठिकाण: विमानतळ सुरक्षा, नांदेड
- श्री अशोक तुकाराम जाधव (पोलीस निरीक्षक):
- पूर्वीची नेमणूक: पोलीस नियंत्रण कक्ष, नांदेड
- बदलीचे नवीन ठिकाण: पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण
- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांनी आता अधिक सजग आणि सावध राहण्याची गरज असल्याची चर्चा पत्रकारांमध्ये सुरू आहे. पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मित्र किंवा निकटवर्तीयांशी संबंधित विषयांवर बातम्या प्रसिद्ध करताना काही पत्रकारांना नोटिसा अथवा इतर प्रकारच्या कारवाईला सामोरे जावे लागल्याचा दावा केला जात आहे. ओमकांत चिंचोळकर यांच्याकडून नवीन नांदेड परिसरातील पत्रकारांचा अनुभव काय होता, याबाबतही पत्रकारांमध्ये चर्चा होत आहे. त्यामुळे संबंधित व्यक्ती किंवा त्यांच्या निकटवर्तीयांविरुद्ध बातम्या प्रसिद्ध करताना पत्रकारांनी वस्तुनिष्ठ माहिती, उपलब्ध कागदपत्रे आणि संबंधितांची बाजू यांचा योग्य समतोल राखणे आवश्यक आहे. विशेषतः बातमीतील शब्दांची निवड, आरोपांचे स्वरूप आणि तथ्यांची पडताळणी याबाबत अधिक काळजी घेणे हितावह ठरेल. पत्रकारितेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवतानाच कायदेशीर बाबींचे भान राखणे आणि कोणत्याही व्यक्तीविषयी अप्रमाणित आरोप टाळणे, हीच अशा परिस्थितीत अधिक सुरक्षित आणि जबाबदार भूमिका ठरू शकते.

Post Views: 123
