सातारा पोलिस डायरी:गाडीच्या डॅशबोर्डमधून 2 लाखांची रोकड लंपास; तर पोलिसांकडून अवैध दारू जप्त




सातारा तालुका हद्दीतील मौजे आटाळी येथील हेरिटेजवाडी हॉटेलच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या चारचाकी क्रमांक(एम.एच. १२ जे.यु. ५५४९)च्या डॅशबोर्डच्या ड्रॉव्हर मध्ये ठेवलेली २ लाखांची रोख रक्कम तेजश्री संतोष सकटे(रा.६३ दुर्गापेठ, सातारा) हिने संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद रविराज दत्तात्रेय हादगे (वय ३३, व्यवसाय इव्हेंट मॅनेजमेंट. राहणार १४०,रामाचा गोट सातारा) यांनी सातारा तालुका पोलिसांत दि.२ रोजी दिली आहे.अधिक तपास पोलीस हवालदार किरण जगताप करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सातारा तालुका पोलिसांनी दारूच्या बाटल्या केल्या जप्त सातारा तालुका पोलिसांनी मौजे देगाव गावच्या हद्दीत असलेल्या तळ्याजवळ १८० मिलीच्या एकूण ९६ दारूच्या बाटल्या आणि हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस गाडी (एम.एच ११ बी.टी ८८५२) असा एकूण ७४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अवधूत धर्मराज चव्हाण (वय २६ वर्ष राहणार वेळे कामथी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत. माजगावकर माळ शाहूपुरी येथे घरफोडी आकाशवाणी केंद्राजवळ असलेल्या माजगावकर माळ येथून दि ३० रोजी बंद असलेल्या पत्र्याच्या शेडच्या पाठीमागील बाजूचा सिमेंटचा दरवाजा अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी साहाय्याने फोडून घरामध्ये प्रवेश केला. यामध्ये ४७ हजार ४०० रुपययांचे सोने-चांदीचे दागिने आणि २० हजार रुपये रोख रक्कम असे ऐकून ६७,४०० रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबतची फिर्याद संगीता अनिल पवार (वय ४५ वर्ष राहणार आकाशवाणी केंद्राजवळ सातारा) यांनी शाहूपुरी पोलिसात दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार घोडके करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चारचाकी वाहनाच्या काचा फोडून नुकसान केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल सातारा कोरेगाव रोडवर एच. पी.गॅस समोर क्षेत्र माऊली येथे राहणारे सेवानिवृत्त शिक्षक अण्णा शिवाजी पवार(वय ५९) यांच्या राहत्या घराच्या पार्किंगमध्ये कंपाउंडच्या पोर्चमध्ये पार्क केलेल्या चार चाकी गाडीची मागील बाजूची काच फोडून ५० हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी अशोक कुंडलिक खाडे आणि राज दशरथ दास (दोघे राहणार क्षेत्र माहुली,सातारा) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात दिनांक २ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी देखील संशयितांनी पवार यांच्या गाडीचे पाच वेळा नुकसान करत जीवे मारण्याची धमकी देखील दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *