अंधेरी पूर्व परिसरात लग्नाचे आश्वासन देत तरुणीचे कथित लैंगिक आणि आर्थिक शोषण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी शिंदे गटाशी संबंधित युवा नेता शिवम दुबे उर्फ ‘चोंग्या’ याला अटक केली आहे. आरोपीने तब्बल तीन वर्षे तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप असून, या काळात तिच्याकडून लाखो रुपये आणि महागडी कार घेतल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपी उत्तर प्रदेशात दुसऱ्या तरुणीसोबत विवाह करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पीडितेने पोलिसांत धाव घेतल्याचे समोर आले आहे. अंधेरी पूर्व येथील महाकाली परिसरात राहणाऱ्या शिवम दुबे उर्फ ‘चोंग्या’विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आश्वासन देऊन एका तरुणीशी जवळीक निर्माण केली आणि त्यानंतर तब्बल तीन वर्षे तिचे लैंगिक शोषण केले, असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत शिवम दुबे याला अटक केली आहे. प्रेमसंबंधातून शोषण केल्याचा आरोप पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, आरोपीने संबंधित तरुणीला लग्नाचे आश्वासन दिले होते. या आश्वासनामुळे दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. त्यानंतर आरोपीने लग्न करण्याचे सांगत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. हा प्रकार एक-दोन वेळा नव्हे, तर तब्बल तीन वर्षे सुरू असल्याचे तक्रारीतून समोर आले आहे. या कालावधीत तरुणीचे केवळ शारीरिकच नव्हे, तर आर्थिक शोषणही करण्यात आल्याचा आरोप आहे. आरोपीने तिच्याकडून लाखो रुपये घेतले, तसेच महागडी कारही घेतल्याचे पोलिस तपासात समोर येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात आर्थिक व्यवहारांचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. उत्तर प्रदेशात दुसऱ्या मुलीसोबत विवाहाची तयारी तीन वर्षांपासून लग्नाचे आश्वासन देऊनही आरोपीकडून लग्नाबाबत ठोस पाऊल उचलले जात नसल्याने पीडित तरुणीसमोर परिस्थिती गंभीर झाली. दरम्यान, शिवम दुबे हा उत्तर प्रदेशात दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पीडितेला मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने थेट एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले. तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर शिवम दुबे याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून या प्रकरणातील घटनाक्रम आणि आर्थिक व्यवहारांबाबत चौकशी केली जात आहे. राजकीय दबावाचा आरोप या प्रकरणाला राजकीय पार्श्वभूमीही असल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. शिवम दुबे हा शिंदे गटाशी संबंधित असून माजी नगरसेवक कमलेश राय आणि नगरसेवक रितेश राय यांच्या जवळचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते. पीडितेच्या आरोपानुसार, तिने पोलिसांकडे जाऊ नये यासाठी संबंधित राजकीय व्यक्तींकडून दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, दबावाला न जुमानता तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. या आरोपांचीही पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये तडीपारीची कारवाई झाल्याचा दावा शिवम दुबे याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. 2023 मध्ये त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती, असा दावा केला जात आहे. मात्र, त्यानंतर राजकीय हस्तक्षेपामुळे ही कारवाई रद्द करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप तपासातून होणे बाकी आहे. आणखी तरुणींची फसवणूक केली का? दरम्यान, शिवम दुबे याने अशाच पद्धतीने इतर तरुणींनाही लग्नाचे आमिष दाखवून फसवले आहे का, याचा तपास एमआयडीसी पोलिसांकडून केला जात आहे. आरोपीचे यापूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड, पीडित तरुणीसोबतचे आर्थिक व्यवहार, फोनवरील संभाषण तसेच इतर संबंधित बाबी तपासल्या जात आहेत. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, या प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येते का, याकडे पोलिस तपासाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पीडित तरुणीने केलेल्या आरोपांची सत्यता आणि राजकीय दबावाच्या दाव्यांचीही तपासातून पडताळणी केली जाणार आहे. हेही वाचा… विकसित भारताचे स्वप्न भाजपच पूर्ण करू शकते:पुणे पदवीधरची उमेदवारी मिळाल्यानंतर स्मिता जाधव यांचा विश्वास पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली राजकीय तयारी वेगाने सुरू केली आहे. शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. स्मिता जाधव आणि स्वामी विवेकानंद संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सविस्तर वाचा…
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर तब्बल 3 वर्षे अत्याचार:लाखो रुपये, कार लाटल्याचा आरोप, शिंदे गटाचा युवा नेता शिवम दुबे उर्फ ‘चोंग्या’ अटकेत