Kalyan Teacher Murder Case Update; CCTV Footage Reveals Planned Conspiracy


कल्याणमधील 53 वर्षीय शिक्षिका आणि एलआयसी एजंट संगीता मारुती चंदनशिवे यांच्या हत्येप्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह सिन्नर-घोटी रस्त्यावर आढळून आल्यानंतर पोलिस तपासाला वेग आला असून, आता भावाच्या झे

.

एलआयसीच्या कामाच्या बहाण्याने घराबाहेर पडल्या

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील एका शाळेत संगीता चंदनशिवे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्याचबरोबर त्या एलआयसी एजंट म्हणूनही काम करत होत्या. त्या अविवाहित असून आंबिवली येथे कुटुंबासह राहत होत्या.

14 जुलै रोजी दुपारच्या सुमारास संतोष जाधव नावाच्या व्यक्तीचा त्यांना फोन आला. एलआयसीच्या कामानिमित्त शहापूरला जात असल्याचे सांगून त्या घरातून बाहेर पडल्या. त्यांनी दुपारी 1.37 वाजताची कसारा लोकल पकडली आणि सुमारे 2.20 वाजता आसनगाव रेल्वे स्थानकात उतरल्या.

आसनगावनंतर अचानक मोबाइल बंद

रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संगीता चंदनशिवे आसनगाव स्थानकावर उतरल्याचे स्पष्ट दिसून आले. मात्र, दुपारी सुमारे 2.30 वाजल्यापासून त्यांचा मोबाईल फोन बंद लागला. रात्री उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नसल्याने कुटुंबीयांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक पुराव्यांची तपासणी करण्यात आली.

दोन दिवसांनी सापडला मृतदेह

बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवसांनी, 16 जुलै रोजी संगीता चंदनशिवे यांचा मृतदेह सिन्नर-घोटी रस्त्यालगत आढळून आला. या घटनेमुळे कल्याणसह परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

भावाच्या झेरॉक्स दुकानातील CCTV मधून महत्त्वाचे धागेदोरे

तपासादरम्यान पोलिसांनी संगीता यांच्या भावाच्या झेरॉक्स दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये महत्त्वाची माहिती समोर आली. 14 जुलै रोजी फोन करणारा संशयित संतोष जाधव याच व्यक्तीने यापूर्वी 25 जून आणि 4 जुलै रोजीही त्या दुकानाला भेट दिल्याचे फुटेजमध्ये दिसून आले.

यावेळी त्याने दुकानातील कर्मचाऱ्याकडे संगीता चंदनशिवे यांच्याबाबत चौकशी केली होती. तसेच त्या एलआयसीचे काम करत असल्याची माहितीही त्याने घेतल्याचे तपासात समोर आले आहे.

पूर्वनियोजित कटाचा संशय

संशयिताने वारंवार चौकशी करून माहिती गोळा केल्याचे समोर आल्याने ही हत्या पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकते, असा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि संशयिताच्या हालचालींचा तपास सुरू असून, या प्रकरणातील सर्व पैलूंची कसून चौकशी केली जात आहे.

दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू असून, लवकरच या हत्येप्रकरणातील नेमका कट आणि त्यामागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा..

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात:इथेनॉल टँकर पलटल्याने सुरू होती एकेरी वाहतूक, ट्रकच्या धडकेनंतर कार पेटली; 6 जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर वर्ध्यातील विरूळ गावाजवळ पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. नागपूरकडे जाणाऱ्या एका कारला मागून भरधाव येणाऱ्या मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, अपघात होताच कारने अचानक पेट घेतला आणि आगीच्या मोठ्या ज्वाळा उसळल्या. या दुर्घटनेत कारमधील चार जणांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि ते आतच जिवंत होरपळले. तर धडक देणाऱ्या मालवाहू वाहनातील दोन व्यक्तीचांही मृत्यू झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. सविस्तर वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *