Pune RTO MH-61 Series Auction; Fancy Numbers For Transport Vehicles

महाराष्ट्र



पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात ‘एमएच-६१’ मालिकेतील आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकांसाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मालवाहू, टुरिस्ट टॅक्सी, बस आणि ॲम्ब्युलन्ससह परिवहन वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. तसेच खासगी चारचाकी वा

.

खासगी चारचाकी वाहनांसाठी पसंती क्रमांक मिळविण्यासाठी ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत परिवहन नवीन नोंदणी विभागात अर्ज करता येतील. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अर्जदारांची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाईल. संबंधित क्रमांकासाठी लिलावाचे डीडी ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.१५ वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहकार सभागृहात लिलाव होईल.

परिवहन वाहनांसाठी पसंती क्रमांकाचे अर्ज ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत स्वीकारले जातील. या क्रमांकांसाठीचे डीडी ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.१५ वाजेपर्यंत जमा करता येतील. लिलाव त्याच दिवशी दुपारी ४ वाजता होईल.

लिलावासाठीचा डीडी ‘R.T.O., Pune’ या नावाने पुण्यातील राष्ट्रीयीकृत किंवा अनुसूचित बँकेचा असणे आवश्यक आहे. डीडी दोन महिन्यांपेक्षा जुना नसावा. अर्जासोबत पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे बंधनकारक आहे. एका क्रमांकासाठी एकाच अर्जदाराने एकच डीडी सीलबंद पाकिटात सादर करावा. चुकीच्या नावाने किंवा विहित शुल्कापेक्षा कमी रकमेचा डीडी स्वीकारला जाणार नाही.

समान रकमेचे डीडी आल्यास संबंधित क्रमांकाची निवड अर्जदारांच्या नावाच्या चिठ्ठीद्वारे केली जाईल. अर्जदार लिलावावेळी उपस्थित नसला तरी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

पसंतीचा क्रमांक राखून ठेवण्याची वैधता महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८१ मधील नियम ५४-अनुसार १८० दिवस राहील. अर्जदार पुणे आरटीओच्या कार्यक्षेत्रातील पत्त्याचा वाहनधारक असणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्राबाहेरील अर्ज, चुकीच्या रकमेचा डीडी किंवा चुकीचा मोबाइल क्रमांक असलेले अर्ज बाद केले जातील.

लिलावानंतर उर्वरित क्रमांकांचे वितरण fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन करण्यात येईल. त्यामुळे त्यासाठी आरटीओ कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज राहणार नाही. लिलावात क्रमांक न मिळालेल्या अर्जदारांनी मूळ डीडी सात दिवसांत परत घ्यावा, असे आरटीओने कळविले आहे.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *