[ads1]
नांदेड (प्रतिनिधी) – हिंगोली गेट परिसरातील फटाका ग्राउंड येथील लिंबाच्या झाडाला एका अनोळखी पुरुषाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून मृताच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे.
घटनाक्रम: दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११:०० वाजता शेख अदनान शेख ईशाख (वय २४ वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. खुब्बनगर, देगलूरनाका, नांदेड) हे काम आटोपून घराकडे जात असताना फटाका ग्राउंड येथे लघूशंकेसाठी थांबले होते. त्यावेळी तेथील लिंबाच्या झाडाला एका अनोळखी पुरुषाने पॉलीएस्टरच्या कपड्याच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर वजीराबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद क्रमांक ८०/२०२६, कलम १७४ बीएनएनएस अन्वये नोंद करण्यात आली आहे.
मृताचे वर्णन व ओळख पटवण्यासाठी खुणा:
- वय: अंदाजे ४५ वर्षे
- रंग व रूपरेखा: सावळा रंग, लांबट चेहरा आणि सरळ नाक
- उंची व बांधा: उंची अंदाजे १६८ सें.मी., सडपातळ शरीरबांधा
- पोषाख: मळकट पांढऱ्या रंगाची बनियन, निळ्या रंगाची पॅन्ट व चॉकलेटी रंगाची अंडरवेअर
- इतर तपशील: चेहऱ्यावर दाढी व मिशी आहे, दंडावर तिळ असून उजव्या हाताच्या मनगटाजवळ इंग्रजीत S A असे अक्षर गोदलेले आहे.
पोलीस आवाहन: सदर मृत व्यक्तीबाबत अथवा त्याच्या नातेवाईकांबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास खालील संपर्क क्रमांकावर वजीराबाद पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
- वजीराबाद पोलीस स्टेशन: ०२४६२-२३६५००
- पोलीस निरीक्षक (वजीराबाद): ९९२१००४४९९
- शरद सोनटक्के पोलीस अंमलदार : ८८०५००७५११

Post Views: 119
[ads2]
















Leave a Reply