![]()
मूर्तिजापूर तालुक्यातील चिखली-कासवी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विकासकामांधील कथित अनियमितता, बोगस बिले आणि ग्रामपंचायतीच्या एकूण कारभारावरून ग्रामस्थ आक्रमक झाले. स्मशानभूमी सौंदर्यीकरण, आरओ प्लांट, ग्रामपंचायत कार्यालयालगतचे शौचालय व नालेसफाई आदी कामांच्या खर्चाचा थेट हिशोब मागत ग्रामस्थांनी प्रशासक, सरपंच व ग्रामसेवकांना घेराव घातला. यामुळे ग्रामसभेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामपंचायतीच्या निधीतून नेमका किती पैसा आला, कोणत्या कामासाठी किती निधी मंजूर झाला आणि प्रत्यक्ष जमिनीवर किती खर्च झाला, याचा सविस्तर तपशील ग्रामस्थांनी मागितला. गावातील अनेक भागांत नाल्या तुंबलेल्या असून अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त आहेत. निधी खर्च होऊनही प्रत्यक्ष कामे का दिसत नाहीत, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. सन २०२४ पासून विविध कामांच्या नावाखाली बोगस बिले काढून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत बिले, व्हाउचर, मंजुरी आदेश आणि मोजमाप पुस्तिका यांची प्रत्यक्ष तपासणी करण्याची मागणी करण्यात आली. या संदर्भात ग्रामसेविकेकडे विचारणा केली असता, “२ सप्टेंबरपर्यंत मुदत द्या, आगामी ग्रामसभेत सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे आता २ सप्टेंबरच्या ग्रामसभेकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी पंधराव्या वित्त आयोग निधीतून केलेल्या विकासकामांची मूळ कागदपत्रांसह संपूर्ण माहिती उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. ‘माझी पंचायत’ ॲपवरील फोटोंवरून संशय ग्रामस्थांनी ‘माझी पंचायत’ ॲपवरील विकासकामांची माहिती व अपलोड केलेल्या छायाचित्रांची पाहणी केली असता प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याचे समोर आले. काही ठिकाणी प्रत्यक्ष काम झालेले नसतानाही अन्य ठिकाणचे जुने किंवा भलतेच फोटो अपलोड करून पूर्ण बिले उचलल्याचा संशय व्यक्त होत आहे. ॲपवरील फोटो, प्रत्यक्ष जागेवरील काम आणि मोजमाप पुस्तिका यांची तातडीने प्रत्यक्ष पडताळणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ताज्या घडामोडी :
- लढाई राहुल गांधींची, निष्ठा नेत्यांची? एनडीटीव्ही रिब्रँडिंगवर काँग्रेसमधील अडानी-भक्ती चव्हाट्यावर!
- हदगाव येथे ३० ऑगस्टला शेतकरी मेळावा व कृतज्ञता सोहळा
- Carlos Alcaraz Returns To US Open After Injury; New York Tennis Comeback
- स्मशानभूमी, आरओ प्लांट व शौचालयांच्या कामांवर प्रश्नचिन्ह:सन 2024 पासून बोगस बिलं काढल्याचा चिखली ग्रामस्थांचा आरोप
- रेणुका शहाणेंनी कास्टिंग काउचचा केला सामना:‘हम आपके हैं कौन’ नंतर चित्रपट सोडले; चाहते म्हणाले- तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती
- शिवाजी अंबुलगेकर यांचे निधन – VastavNEWSLive.com
- हॉकी वर्ल्ड कप- भारताने पाकिस्तानला 5-3ने हरवले:टॉप-8 मध्ये दाखल; कर्णधार हरमनप्रीत व अभिषेकने 2-2 गोल केले
- मराठा समाजातील महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात मनमाडला तीव्र निदर्शने:पोलिस ठाणे व मंडळ अधिकाऱ्यांना निवेदन; संबंधितावर कारवाईची मागणी

