![]()
संत गाडगेबाबा हे थोर समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या जीवनातून स्वच्छता, समाजसेवा आणि मानवतावाद यांचा आदर्श घालून दिला. गावोगावी जाऊन त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आणि दारू, अंधश्रद्धा व सामाजिक दुर्गुणांविरुद्ध जनजागृती केली. भिक्षेतून मिळाले
.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. श्याम तंतरपाळे, तर अतिथी म्हणून, प्रा. डॉ. राजेश देशमुख, प्रा. ॲड. विशाखा सोनटक्के, प्रा. ॲड. भारत ढोके, ॲड. हरीश निंभाळकर, ॲड. उज्वल सोनवणे, प्रा. स्वप्नील मानकर , प्रा. मेघा चिमणकर, प्रा. ज्योती टाले, प्रा. राधा काळे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रकाश म्हस्के, सहा प्रा. दीपाली पडोळे, प्रा. डॉ. अंभोरे , प्रा. डॉ. खेडकर, प्रा. डॉ. शुद्द्धोधन कांबळे , प्रा. दीपाली गवई आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. राव म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा हे दोघेही राष्ट्राच्या समाज सुधारणेच्या परंपरेतील महत्त्वाचे समन्वयी व्यक्तिमत्त्व होते. बाबासाहेबांनी सामाजिक समता, मानवाधिकार, शिक्षण आणि संविधानिक मार्गाने अन्यायाविरुद्ध संघर्ष केला, तर गाडगेबाबांनी स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा, अंधश्रद्धा निर्मूलन आणि करुणेच्या मूल्यांद्वारे समाजजागृती घडवली. बाबासाहेबांचा विचार बौद्धिक व संघटनात्मक पातळीवर क्रांती घडवणारा होता, तर गाडगे बाबांचे कार्य प्रत्यक्ष कृतीतून जनसामान्यांपर्यंत पोहोचले. त्यामुळे विचारांची दिशा वेगळी असली तरी उद्दिष्ट एकच असल्याने बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगेबाबा यांच्यात वैचारिक व कृतीशील समन्वय स्पष्टपणे दिसून येतो, असेही ते म्हणाले. कार्यक्रमात विविध मान्यवरांनी ही यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्राध्यापकवर्ग, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी, शिक्षक व शिक्षकेत्तर सर्व सहकारी आदींनी परिश्रम घेतले.
अज्ञान व अंधश्रद्धा दूर करण्यास सक्रिय भूमिका अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. तंतरपाळे म्हणाले की,संत गाडगे बाबांचे विचार अत्यंत व्यवहार्य आणि समाजाभिमुख होते. त्यांच्या मते खरे शिक्षण म्हणजे केवळ अक्षरज्ञान नव्हे, तर स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा, नैतिकता आणि समाजसेवेची जाणीव निर्माण करणारी प्रक्रिया होय. विद्यार्थ्यांनी समाजातील दु:ख, अज्ञान व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असे ते मानत. सामाजिकतेच्या दृष्टीने शिक्षणाने माणूस माणसाशी जोडला गेला पाहिजे, भेदभाव नष्ट झाला पाहिजे आणि सेवाभाव विकसित झाला पाहिजे, हा गाडगेबाबांचा आग्रह होता. विद्यार्थी हा परिवर्तनाचा सक्रिय घटक असावा, असेही ते म्हणाले.
