![]()
खोपोली नगरपालिकेच्या शिंदे सेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येमुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या प्रकरणातील नऊ आरोपींना न्यायालयाने 5 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असली तरी, यावरून
.
आमदार महेंद्र थोरवे यांनी या हत्येमागे राजकीय षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीच्या आरोपींना अटक होऊ नये यासाठी खासदार सुनील तटकरे पोलिसांवर दबाव आणत आहेत, असा थेट आरोप थोरवे यांनी केला. हत्येचा सूत्रधार ‘सुतारवाडी’त (सुनील तटकरे यांचे निवासस्थान) बसला असून, जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही आणि त्यांना फाशीची शिक्षा मिळत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, या प्रकरणातील गुन्हेगारांवर ‘मकोका’ लावण्याची मागणी त्यांनी केली असून काळोखे कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट केले.
एसआयटी चौकशीतून कोणी काय केले हे समोर येईलच- सुनील तटकरे
महेंद्र थोरवे यांच्या आरोपांनंतर खासदार सुनील तटकरे यांनी तातडीने कर्जतमध्ये धाव घेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या हत्येचे आम्ही समर्थन करत नाही, मात्र या घटनेचे राजकारण करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की सत्य लवकरच बाहेर येईल, असे तटकरे म्हणाले. या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एसआयटी चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोणी काय काय केले आहे, हे चौकशीतून समोर येईलच. मी योग्य वेळी यावर सविस्तर बोलेन, असा इशारा देत त्यांनी कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले.
