[ads1]
![]()
१५ व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपात मनमानी केली जात आहे. मोहोळ पंचायत समितीमधील विरोधी सदस्यांना विश्वासात घेऊन निधीचे वाटप होत नाही, तोपर्यंत आराखडा मंजूर होऊ देणार नाही, असा इशारा देत लोकशाही मूल्ये अधिकाऱ्यांनी जपावीत, असा सल्ला आमदार राजू खरे यांनी पंचायत समिती समोर उपोषण सुरू आहे. मोहोळ तालुका पंचायत समितीच्या कार्यालयासमोर दि. १५ सप्टेंबर पासून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विवेक जमदाडे यांची विभागीय चौकशी करून तातडीने बदली करावी. १५ व्या वित आयोगाच्या निधीचे समान वाटप करावे, विरोधी गटनेते बाळासाहेब गायकवाड यांच्यासह पं.समितीच्या पाच सदस्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आमदार राजू खरे यांनी संबंधित विषयावर तातडीने मार्ग काढावा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून केली. या उपोषणामध्ये पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब गायकवाड, धनाजी माळी, डॉ. अमित व्यवहारेसह गणेश मुळे हे पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. ^वरिष्ठांना बोललो होतो, तरीही माझ्याकडे अतिरिक्त चार्ज दिला आहे. निधी वाटप झाले, तेंव्हा पंचायत समितीच्या बैठकीत सर्व सदस्य उपस्थित होते. आराखडा मांडल्यानंतर संमती नसल्याने संबंधितांनी बैठकीतून सभात्याग केला. चर्चा सुद्धा केली नाही. आराखडा व निधी वाटपाचा अधिकार पंचायत समिती सभागृहाकडे असतो. दोषींवर कारवाई केली आहे. -विवेक जमदाडे, बीडीओ, पंचायत समिती, मोहोळ
[ads2]
वित्त आयोगाच्या निधी वाटपामध्ये बीडीओंच्या मनमानीविरुद्ध उपोषण:प्रत्येक ग्रामपंचायतीच्या अशाप्रकारे तक्रारी येत आहेत
















Leave a Reply