![]()
मुंबईत एकीकडे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केली असतानाच, आता छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मोठे खिंडार पडले आहे. मनसेचे जिल्हाप्रमुख सुमित खांबेकर यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंद
.
सुमित खांबेकर हे मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत सावलीसारखे उभे होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत (मनविसे) तळमळीने काम केले. त्यांच्या कामाची दखल घेऊन राज ठाकरेंनी त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत खांबेकर यांनी तत्कालीन औरंगाबाद (आताचे छत्रपती संभाजीनगर) पूर्व मतदारसंघातून मनसेच्या तिकीटावर निवडणूकही लढवली होती.
शिंदे गटाची ताकद वाढली
सुमित खांबेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालना परिसरात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः आक्रमक कार्यकर्त्यांची फळी सोबत असल्याने आगामी निवडणुकीत याचा फायदा शिंदे गटाला मिळू शकतो.
महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेची पिछेहाट
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी मनसेने शहरात मोठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र, मुख्य जिल्हाप्रमुखानेच ऐनवेळी साथ सोडल्याने शहरात मनसेची संघटनात्मक बांधणी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. मनसेचे अनेक जुने आणि जाणते चेहरे पक्ष सोडून गेल्याने आता राज ठाकरे यावर काय भूमिका घेतात आणि संभाजीनगरमध्ये नवीन नेतृत्व कोणाकडे सोपवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुमित खांबेकर आणि वाद
11 वर्षांपूर्वी सुमित खांबेकर यांच्या कंपनीतून छत्रपती संभाजीनगर शहरातील खाम नदीत विषारी द्रव्ये सोडल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी सुमित खांबेकर हे मनसेचे शहरप्रमुख होते. त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राज ठाकरे यांनी सुमित खांबेकर यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. असे कृत्य करणारे एखाद्या पक्षातच नव्हे, तर समाजातही राहण्याच्या लायकीचे नाहीत. त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही, असेही राज ठाकरे म्हणाले होते. मात्र, अवघ्या पंधराच दिवसांत राज ठाकरे यांनी आपली भूमिका बदलली. खांबेकर याला राजकीय प्रकरणातून अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे. हा एक राजकीय डाव असल्याचे म्हणत राज ठाकरे यांनी सुमित खांबेकर यांना पुन्हा शहराध्यक्ष पद बहाल केले होते.
