Prithviraj Chavan Predicts Political Upheaval Links Epstein Files Claims Prime Minister Change Possibility India | पंतप्रधान बारामती किंवा कराडचे नसतील: एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य, म्हणाले- राजकीय उलथापालथ होऊ शकते – Mumbai News



देशात 19 डिसेंबर रोजी मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवल्यानंतर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा आपल्या विधानाचे समर्थन करत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. अमेरिकेतील गाजत असलेल्या ‘एपस्टिन फाईल्स’चा संबंध थेट भारतीय राजक

.

पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले की, 19 डिसेंबरबाबत मी केवळ शक्यता वर्तवली होती, तो माझा दावा नव्हता. एपस्टिन फाईल्स संदर्भात अमेरिकेत अद्याप मोठा संघर्ष सुरू आहे. या फाईल्समध्ये अनेक अल्पवयीन मुलींच्या नावांचा समावेश असून काही ठिकाणी कागदपत्रे काळी करण्यात आली आहेत. यात भारतातील अनेक बड्या नावांचा समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच भारतीय राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते, असे चव्हाण म्हणाले.

पंतप्रधान बारामती किंवा कराडचे नसतील

मराठी पंतप्रधान होण्याबाबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचक संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, होणारा पंतप्रधान हा मराठी माणूस असेल आणि तो भाजपमधीलच असू शकतो. महत्त्वाचे म्हणजे, हा पंतप्रधान बारामती (पवार कुटुंब) किंवा कराड (स्वतः चव्हाण) येथील नसेल. भारताचे नवीन पंतप्रधान कोण असतील, हे आता सर्वांना माहीत आहे, असे म्हणत त्यांनी नाव न घेता सस्पेन्स वाढवला आहे.

इंडिगो एअरलाईन्स आणि अदानी कनेक्शनवर प्रश्नचिन्ह

राजकीय भाकितांसोबतच पृथ्वीराज चव्हाण यांनी इंडिगो विमान कंपनीच्या कारभारावरही ताशेरे ओढले. इंडिगोच्या मक्तेदारीमुळे प्रवाशांचे हाल होत असून कंपनीला त्यांच्या मालमत्तेच्या 10 टक्के दंड करण्याची तरतूद असलेल्या कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. अदानी यांनी पायलट ट्रेनिंग सुरू केल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत हा सर्व घोळ सुरू झाला आहे. या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही चव्हाण यांनी यावेळी केली.

पृथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वी काय दावा केला होता?

19 डिसेंबर रोजी देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल. त्यात भारताचा पंतप्रधान बदलून एक मराठी माणूस पंतप्रधान होईल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्या या विधानावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी ठाम विश्वास व्यक्त करत या तारखेविषयी उत्सुकता वाढवली आहे. पृथ्वीराज चव्हाण अनुभवी नेते आहेत. त्यांनी पीएमओमध्येही काम केले आहे. त्यामुळे त्यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे .

पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधानपदी एखादा मराठी माणूस विराजमान होणार असल्याचा दावा करून एकच खळबळ उडवून दिली होती. अमेरिकेतील एका इस्त्रायलच्या गुप्तहेराने एक मोठे स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्यात जगभरातील दिग्गज नेत्यांची नावे आहेत. पण ती नावे कुणाची आहेत याची कल्पना अद्याप कुणाला आली नाही. अमेरिकन सरकार एक कायदा करून ही नावे उघड करत आहे. त्याचे जगभरात पडसाद उमटण्याची शक्यता असून, त्याचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताचा पंतप्रधान बदलून एक मराठी माणूस पंतप्रधान होईल, असे ते म्हणाले होते. यासाठी त्यांनी 19 डिसेंबरची तारीख दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *