Tata Motors Achieves 2.5 Lakh EV Sales Strengthens India Market Leadership Nexon EV Leads Portfolio Expands | टाटा.इव्हीने 2.5 लाख विक्रीचा टप्पा पार केला: भारतातील ईव्ही बाजारात 66 टक्के वाट्यासह नेतृत्व भक्कम – Pune News



टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) विक्रीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कंपनीने देशभरात २.५ लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री पूर्ण केली आहे. या यशासह टाटा.इव्हीने भारतीय ईव्ही बाजारात आपले नेतृत्व अधिक भक्कम केले असून, त्यांचा बाजारातील वाटा सुमार

.

भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या प्रवासात टाटा मोटर्स आघाडीवर आहे. २०२० मध्ये लाँच झालेली नेक्सॉन.इव्ही ही देशातील पहिली मुख्य प्रवाहातील इलेक्ट्रिक कार ठरली. आतापर्यंत या मॉडेलने १ लाख विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. टाटा.इव्हीकडे टियागो.इव्ही, पंच.इव्ही, नेक्सॉन.इव्ही, कर्व्ह.इव्ही, हॅरियर.इव्ही आणि फ्लीटसाठी एक्स्प्रेस-टी इव्ही यांसारख्या विविध मॉडेल्सचा व्यापक पोर्टफोलिओ आहे, जे सर्व प्रमुख बॉडी स्टाइल्स आणि किंमत श्रेणींमध्ये उपलब्ध आहेत.

या कामगिरीबद्दल बोलताना टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडचे एमडी व सीईओ शैलेश चंद्रा म्हणाले, “२.५ लाख ईव्ही विक्रीचा टप्पा म्हणजे भारतीय ग्राहकांचा इलेक्ट्रिक मोबिलिटीवरील वाढता विश्वास दर्शवतो. आमचा उद्देश केवळ वाहने विकण्याचा नव्हता, तर स्वच्छ मोबिलिटीसाठी एक मजबूत ईकोसिस्टम तयार करण्याचा होता.”

टाटा.इव्हीचे ग्राहक आता देशभरातील १ हजार हून अधिक शहरे आणि गावांमध्ये पसरले आहेत. सुमारे ८४ टक्के ग्राहक ईव्हीला त्यांचे प्राथमिक वाहन म्हणून वापरतात, तर २६ टक्के ग्राहक हे पहिल्यांदाच कार खरेदी करणारे आहेत. सरासरी टाटा.इव्ही ग्राहक दरवर्षी २० हजार किलोमीटर प्रवास करतो आणि आतापर्यंत एकत्रितपणे १२ अब्ज किलोमीटरचे अंतर या वाहनांनी पार केले आहे.

चार्जिंग सुविधांच्या बाबतीतही टाटा.इव्हीने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. देशभरात २ लाखांहून अधिक चार्जिंग पॉइंट्स, २० हजार सार्वजनिक चार्जर्स आणि १०० मेगाचार्जिंग हब्स उपलब्ध करून ईव्ही प्रवास अधिक सुलभ करण्यात आला आहे. या सर्व प्रयत्नांमुळे सुमारे १.७ दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन टाळले गेले असून, टाटा.इव्ही भारताच्या शाश्वत भविष्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *