Aaditya Thackeray Slams Centre Aravalli Mining Western Ghats | विकासाच्या नावाखाली विनाश होतोय: आज अरवली, उद्या पश्चिम घाट-हिमालय; ‘अरवली’च्या वादावरून आदित्य ठाकरेंचा केंद्रावर घणाघात – Mumbai News



शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी अरवली पर्वतरांगांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री अरावली पर्वतरांगा उद्ध्वस्त करण्याचे समर्थन करतात, ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंन

.

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने अरवली पर्वतरांगेची व्याप्ती ठरवण्यासाठी केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीने सुचवलेली व्याख्या स्वीकारली. या नव्या व्याख्येनुसार जमिनीपासून ज्या भू-आकृतींची उंची किमान 100 मीटर आहे, त्यांनाच ‘अरवली पर्वतरांग’ मानले जाईल. 100 मीटरपेक्षा कमी उंची असलेल्या टेकड्या किंवा भाग आता तांत्रिकदृष्ट्या ‘अरवली’च्या व्याख्येतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे, कारण 100 मीटरपेक्षा कमी उंचीच्या भागांत आता खाणकाम आणि बांधकामासाठी खुला होण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, केंद्र सरकारवर सडकून टीका करत, भाजप पर्यावरणाचा विनाश करायला निघाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

नेमके काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे यांनी अरवलीतील खाणकामाला दिलेल्या परवानगीबाबत केंद्र सरकारला काही रोकडे सवाल विचारले आहेत. ते म्हणाले, “या प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतरही सरकार यावर खोटे का बोलत आहे? अरवली टेकड्यांचा एखादा छोटा भाग जरी असला, तरी तो खाणकामासाठी खुलाच का केला जात आहे? ज्याप्रमाणे भाजप देशाची सामाजिक वीण नष्ट करत आहे, त्याचप्रमाणे ते देशाची पर्यावरण व्यवस्थाही नष्ट करण्यासाठी का उतावीळ आहेत?”

आज अरवली, उद्या पश्चिम घाट-हिमालय

अरवली टेकड्यांच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी भविष्यातील धोक्याचा इशाराही दिला आहे. “आज अरवली टेकड्यांवर खाणकामाची परवानगी दिली जात आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर उद्या ते खाणकामासाठी पश्चिम घाट किंवा हिमालय देखील खुले करतील,” अशी भीती आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

राजस्थानमधील जनआंदोलनाचे कौतुक

अरवली टेकड्यांच्या रक्षणासाठी राजस्थानमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचे आदित्य ठाकरेंनी समर्थन केले आहे. “अरवली टेकड्या वाचवण्यासाठी संपूर्ण राजस्थान ज्या प्रकारे रस्त्यावर उतरला आहे, ते पाहून प्रेरणा मिळते,” असे ते म्हणाले.

सध्याच्या सरकारकडून अपेक्षा नाही

नैसर्गिक संसाधनांचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे सांगतानाच आदित्य ठाकरे यांनी विद्यमान केंद्र सरकारवर अविश्वास दर्शवला. “सरकारने आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संरक्षणासाठी आता दुप्पट वेगाने प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु, अशा प्रकारच्या संरक्षणाची आणि सकारात्मक कामाची आशा सध्याच्या सरकारकडून मुळीच नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *