![]()
पुण्यात तीन दिवसीय ‘ऑन्को 360 2025’ या राष्ट्रीय ऑन्कोलॉजी परिषदेला सुरुवात झाली आहे. एमओसी कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटरच्या वतीने कोरेगाव पार्क येथील हॉटेल वेस्टिन येथे १२ ते १४ डिसेंबर या कालावधीत ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. यात देशभरातील २००
.
या परिषदेत प्रिसिजन ऑन्कोलॉजी, टार्गेटेड थेरपी, मॉलेक्युलर ऑन्कोलॉजी, थोरॅसिक ऑन्कोलॉजी आणि प्रगत उपचार धोरणे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे. रुग्णांच्या वास्तविक केसेसवरील संवादात्मक सत्रे आणि वैज्ञानिक वादविवाद यांमुळे भारतीय संदर्भात जागतिक नवोपक्रम कसे राबवता येतील, यावर प्रकाश टाकला जाईल.
आंतरराष्ट्रीय पाहुण्यांमध्ये मॅकारी युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे डॉ. अॅलिसन झँग, युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्गचे डॉ. अॅडम ब्रफ्स्की, मायो क्लिनिकचे डॉ. अॅक्सेल ग्रॉथी, यूटी हेल्थ सॅन अँटोनियोचे डॉ. दारुका महादेवन आणि युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो कॅन्सर सेंटरचे डॉ. रॉस कॅमिज यांचा समावेश आहे.
उद्घाटनप्रसंगी एमओसीचे सीनिअर ऑन्कोलॉजिस्ट डॉ. तुषार पाटील म्हणाले, “ऑन्को 360 हे जागतिक संशोधन आणि भारतीय क्लिनिकल प्रॅक्टिस यांच्यातील एक मजबूत दुवा आहे. अर्थपूर्ण संवाद आणि सहकार्याद्वारे देशभरातील कर्करोग रुग्णांना उत्तम उपचार परिणाम मिळवून देण्याचे आमचे ध्येय आहे. ऑन्कोलॉजीतील सर्वोत्तम बुद्धिमत्तांना एकत्र आणणारा हा मंच तयार केल्याचा आम्हाला अभिमान आहे.”
ही परिषद भारतीय कर्करोग उपचार क्षेत्राला नवी दिशा देणारी ठरेल, तसेच उपचार पद्धती मध्ये मूलभूत बदल करण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
