नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात व्हॉट्सअॅप चॅटबॉटची सुरूवात नागरिकांना सर्व माहिती आता फक्त दोन क्लिकमध्ये!

0
WhatsApp-Image-2025-12-11-at-6.09.41-PM.jpeg

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात व्हॉट्सअॅप चॅटबॉटची सुरूवात
नागरिकांना सर्व माहिती आता फक्त दोन क्लिकमध्ये!

नांदेड – महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांसाठी अत्याधुनिक व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा सुरू केली आहे. नागरिकाभिमुख, पारदर्शक व सुलभ प्रशासनाचा लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ही सुविधा विकसित करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा चॅटबॉट मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित सर्वसमावेशक माहिती नागरिकांना कोणत्याही अडचणीशिवाय मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

नागरिकांनी QR कोड स्कॅन करून किंवा 8668223326 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप संदेश पाठवून या चॅटबॉट सेवेला जोडता येणार आहे. याद्वारे जिल्हाधिकारी नांदेड यांच्याशी संबंधित माहिती, तक्रारी, शासकीय योजना आणि विविध सेवांचा लाभ घेत येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी कर्डिले यांनी केले आहे.

चॅटबॉटद्वारे उपलब्ध होणाऱ्या प्रमुख सेवा:

  • जिल्हाधिकारी कार्यालयाची संपूर्ण माहिती
  • वरिष्ठ अधिकारी आणि विभागनिहाय संपर्क तपशील
  • विविध विभाग व शासकीय योजनांची माहिती
  • नागरी सेवा व RTS सुविधा
  • आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शक सेवा
  • तक्रार निवारणासाठी आवश्यक दुवे
  • जमीन व महसूल विभागाशी संबंधित माहिती

या सेवांचा लाभ नागरिकांना फक्त दोन क्लिकमध्ये मिळणार असून, जिल्ह्यातील प्रशासन अधिक सुलभ, पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा चॅटबॉट महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed