'नदीष्ट' आता बंगाली वाचकांच्या भेटीला:हिंदी, कन्नड, गुजरातीनंतरही भाषिक प्रवास सुरूच; 26 आवृत्त्यांनंतर यशाची नवी मोहीम!

महाराष्ट्र

[ads1]


प्रा. मनोज बोरगावकर यांची बहुचर्चित आणि अत्यंत लोकप्रिय ठरलेली ‘नदीष्ट’ ही मराठी कादंबरी आता बंगाली भाषेत अनुवादित झाली आहे. 2019 मध्ये मुंबईच्या ‘ग्रंथाली प्रकाशना’ने प्रकाशित केलेल्या या कादंबरीने वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवत साहित्य क्षेत्रात नवी ओळख निर्माण केली आहे. कोलकाता येथील प्रसिद्ध ‘तुहीना प्रकाशना’ने हा बंगाली अनुवाद प्रसिद्ध केला असून, मूळच्या पंजाबी असलेल्या मात्र बंगाली भाषेत लेखन करणाऱ्या प्रसिद्ध अनुवादक बेबी कारफर्मा यांनी हा अनुवाद केला आहे. सर्व स्तरांतून मनोज बोरगावकर आणि ‘नदीष्ट’च्या या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. टागोरांच्या कादंबरीशी तुलना ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी व लेखक निलांजन शांडील्य यांनी बंगाली आवृत्तीची प्रस्तावना लिहिली असून, यात त्यांनी या कादंबरीची तुलना रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘घाट की बात’ आणि विभूतीभूषण बंडोपाध्याय यांच्या ‘आरण्यक’शी केली आहे. पुरस्कार आणि मान्यता नदीष्ट कादंबरीला यापूर्वी अनेक पुरस्कार मिळालेत. महाराष्ट्र राज्य शासनाचा ‘ह. ना. आपटे पुरस्कार’ आणि बँक ऑफ बडोदाचा राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. सोबतच या कादंबरीच्या हिंदी अनुवादाला तब्बल 5 लाख रुपयांच्या ‘राष्ट्रभाषा सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अनुवाद आणि भाषा भगिनींमधील विस्तार ‘नदीष्ट’ने प्रादेशिक सीमा ओलांडून विविध भाषांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे: हिंदी: गोरख थोरात (सेतू प्रकाशन, नोएडा) कन्नड: चंद्रकांत पोकले गुजराती: डॉ. उर्वशी मनुप्रसाद पांड्या बंगाली: बेबी कारफर्मा अभ्यासक्रमात समावेश स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या B.A. हिंदी (चौथे सेमिस्टर) अभ्यासक्रमात या कादंबरीच्या हिंदी अनुवादाचा समावेश करण्यात आला आहे. ‘नदीष्ट- उपन्यास की कथावस्तु’, ‘मन्युष्य और पर्यावरण’, ‘उद्देश्य’ आणि ‘समीक्षा’ या घटकांतर्गत 60 गुणांसाठी याचे अध्ययन-अध्यापन केले जात आहे. विषय आणि स्वरूप नदीष्ट कादंबरी नदी, पर्यावरण आणि LGBT समूह यांसारख्या जागतिक व संवेदनशील विषयांवर आधारित आहे. निसर्ग आणि मानवातील अद्वैतभाव मांडणाऱ्या या कादंबरीच्या 2019 पासून आतापर्यंत 26 आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘स्टोरीटेल इंडिया’द्वारे सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांच्या आवाजात ‘नदीष्ट’चे ऑडिओ बुकही उपलब्ध करून देण्यात आले आहे. लेखकांचे अन्य साहित्य मनोज बोरगावकर यांनी साहित्याच्या विविध प्रकारांत लेखन केले असून, त्यांची ‘अकथ कहाणी सद्गुणांची’ (ललित), ‘कोरा कागद निळी शाई’ (कवितासंग्रह), ‘पाश्चिमात्य विचारप्रवाह’, ‘लोकप्रशासन’ आणि ‘स्वातंत्र्य पूर्वकालीन राजकीय विचारप्रवाह’ ही पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. संबंधित वृत्तः नदीष्टचा अभ्यास:मनोज बोरगावकर यांची ‘नदीष्ट’ BA हिंदीला; नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शिकवणार कलेचा मान:बोरगावकरांच्या ‘नदीष्ट’ला 5 लाखांचा राष्ट्रभाषा सन्मान; बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका गीतांजली श्री यांच्या हस्ते गौरव लेखकाचा गौरव:मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीला 5 लाखांचा पुरस्कार; राष्ट्रभाषा सन्मानाच्या अंतिम फेरीत धडक नदीष्ट पर्व गुजरातीमध्ये:साहित्य अकादमीकडून कादंबरीचा अनुवाद प्रकाशित; मनोज बोरगावकरांच्या लेखणीला मानाचे पान मानाचे पान:मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीला ‘सावाना’चा पुरस्कार; मंगळवारी नाशिकमध्ये अच्युत गोडबोले यांच्या हस्ते गौरव

[ads2]

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *