दिव्य मराठी एक्स्पोज:ऑडिटरनीच घेतले ‘नाफेड’चे ठेके, एका संस्थेचे लेखा परीक्षक बनले दुसऱ्या संस्थेचे अध्यक्ष

0
new-project-2026-06-05t100100812_1780633936.jpg




केंद्र सरकारच्या कांदा दर स्थिरीकरण योजनेअंतर्गत कांदा खरेदीच्या नावाने सुरू असलेल्या सावळ्या गोंधळाचे पुरावे ‘दिव्य मराठी’च्या हाती लागले आहेत. बंद पडलेल्या सहकारी संस्थांनाच टक्केवारी देऊन या ठेक्यासाठी वापरल्याचे त्यातून पुढे येत आहे. विशेष म्हणजे सहकार विभागाचे अधिकृत लेखापरीक्षकच या घोटाळ्यात सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे. कांदा खरेदीचा अनुभव नसाताना कापडी पिशव्या बनवण्यासाठी स्थापन झालेल्या स्त्री शक्ती महिला अटल सहकारी संस्थेला नाफेडने कांदा खरेदीचा ठेका दिल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणले. विशेष म्हणजे या संस्थेच्या अध्यक्षा दिपाली वसंत कुलथे या सहकार विभागाच्या अधिकृत लेखापरीक्षक आहेत. कांदा खरेदीचा ठेका मिळालेल्या वैष्णवी सहकार संस्थेचे त्यांनी ऑडिट केले. आपण कोणताही गैरप्रकार केला नसून शेतकऱ्यांचे हित आणि महिलांसाठीरोजगार या उद्देशाने कांदा खरेदीचे काम घेतल्याचे कुलथे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगिले. दिपाली कुलथे वैष्णवी संस्थेच्या होत्या लेखापाल दिपाली कुलथे या महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाच्या प्रमाणित लेखा परीक्षक आहेत. त्यांनी वैष्णवी अटल नावीन्यपूर्ण बहुद्देशीय सहकारी संस्थेचे ऑडिट केले आहे. या संस्थेला नाफेडतर्फे सध्या कांदा खरेदीचा ठेका देण्यात आला आहे. स्त्री शक्ती महिला अटल संस्थेच्या नावे घेतला ठेका याच दिपाली कुलथे स्त्री शक्ती महिला अटल सहकारी संस्थेच्या अध्यक्ष आहेत. पिशव्या शिवणे, पापड तयार करणे यासह अनेक उद्देशांसाठी ही स्थापन करण्यात आली. संस्थेच्या सीईओंना कांदा खरेदीचा अनुभव असल्याने हे काम घेतल्याचे कुलथे यांनी सांगिले. पत्ता नाशिकचा, कंपनी बागलाणची, शेतकरी परराज्यातले गेल्यावर्षी नाफेडतर्फे फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांना कांदा खरेदींचे ठेके देण्यात आले होते. त्यातील एक कंपनी होती बागलाण फार्मर प्रोड्यूसर कंपनी. बंद पडलेल्या या कंपनीचा शोध ‘दिव्य मराठी’ने घेतला असता ना कंपनी सापडली ना तिचे संचालक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *