Amravati Teachers Nature Conservation Workshop; BNHS & NCSA Joint Event

[ads1]

शालेय विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, जैवविविधतेबद्दल जागरूकता आणि पर्यावरण संवर्धनाची भावना रुजवण्यासाठी अमरावतीत शिक्षकांसाठी एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. निसर्ग संरक्षण संस्था (NCSA) आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) यांनी संयुक्तप

.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) निसर्ग मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी शालेय शिक्षकांसाठी अशा कार्यशाळा घेते. ही दोन दिवसीय कार्यशाळा होती. तिचा पहिला दिवस अमरावती शहरात, तर दुसरा दिवस धारणी तालुक्यातील मुठवा येथील वनसंवाद केंद्रात झाला. जिल्ह्यातील विविध शाळांमधील २६ शिक्षकांनी यात उत्साहाने भाग घेतला. पहिल्या दिवशी शिक्षकांना अमरावती येथील मेळघाट टायगर रिझर्व्ह व पर्यटन केंद्राच्या (कॅम्प परिसर) कुलाधाप येथे प्रशिक्षण मिळाले. दुसऱ्या दिवशी मेळघाट येथील निसर्ग संरक्षण संस्थेच्या धारणी तालुक्यातील मुठवा, वनसंवाद केंद्र, बोरी-कोठा येथे प्रशिक्षण झाले.

अमरावती येथील कार्यक्रमाला मणीबाई गुजराती हायस्कूलच्या प्राचार्य अंजली देव, निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश एकघरे, रिसेटलमेंट ऑफिसर अतुल तीखे, वृंदा बापट आणि संजय विधळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रेखा सुर्वे, शिक्षक प्रकाश लड्ढा आणि विशाल बनसोड यांच्या उपस्थितीत समारोप झाला. आरती वर्मा यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मेळघाट येथील कार्यशाळेला वनक्षेत्रपाल शुभांगी राऊत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. संस्थेचे संस्थापक प्रा. निशिकांत काळे यांनी कार्यक्रमाला मार्गदर्शन केले आणि मुठवा ट्रेनिंग सेंटरच्या कामाची माहिती दिली. वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी नंदकिशोर दुधे यांनी BNHS निसर्ग मंडळ उपक्रमाची रचना, शाळांमध्ये निसर्ग मंडळ कसे स्थापन करावे, शालेय जैवविविधता नोंदवहीचे महत्त्व आणि ती कशी तयार करावी, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. प्रकल्प सहयोगी रोहन चव्हाण यांनी निसर्ग मंडळाचे वार्षिक उपक्रम सांगितले.

त्यांनी विद्यार्थ्यांना वर्षभर पक्षीनिरीक्षण, निसर्गभ्रमंती, जैवविविधता अभ्यास आणि पर्यावरण जनजागृती यांसारखे उपक्रम शाळेत प्रभावीपणे कसे राबवता येतील, याबद्दल मार्गदर्शन केले. प्रा. निशिकांत काळे यांनी संस्थेचा इतिहास, विविध पर्यावरण उपक्रम आणि पर्यावरणाच्या समस्यांबद्दल माहिती दिली. कार्यशाळेत शिक्षकांना पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाशी संबंधित विविध पुस्तके व शैक्षणिक साहित्य वाटण्यात आले. शाळांच्या गरजेनुसार विज्ञान पेटीही उपलब्ध करून दिली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन समन्वयक धनंजय सायारे यांनी केले.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *