शुभारंभच्या 10 दिवसीय नाट्य कार्यशाळेचा समारोप:कलाकारांनी सादर केली स्वगते, मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप

0
b5f7f927-331b-4faa-91a6-b8903960e98f_1780583995163.jpg




अमरावती येथील ‘शुभारंभ थिएटर्स कल्चरल अँड एज्युकेशनल सोसायटी’ने आयोजित केलेल्या दहा दिवसीय नाट्य कार्यशाळेचा नुकताच उत्साहात समारोप झाला. या सांगता समारंभाला प्रसिद्ध नाट्य अभिनेते प्रसाद खरे आणि ख्यातनाम नाट्य लेखक-दिग्दर्शक अभय नवाथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दहा दिवस चाललेल्या या कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेल्या सर्व कलाकारांनी समारोप प्रसंगी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. त्यांनी एकापेक्षा एक सरस ‘स्वगत’ सादर केले, ज्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली. सादरीकरणानंतर मान्यवरांच्या हस्ते सर्व सहभागी शिबिरार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना पाहुण्यांनी सांगितले की, नाट्यसंस्कार हे केवळ अभिनयापुरते मर्यादित नसून ते व्यक्तिमत्त्व विकासाचे उत्तम माध्यम आहे. रंगभूमीवर उत्तम कामगिरी करण्यासाठी कलाकारांमध्ये सातत्य आणि सराव असणे अत्यंत गरजेचे आहे. याप्रसंगी ‘शुभारंभ थिएटर्स’ कल्चरल एज्युकेशनल सोसायटीचे अध्यक्ष शुभम ठाकरे, उपाध्यक्ष अमेय अनसिंगकर आणि सचिव श्रद्धा कडू प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सदस्य प्रणव कोरे, निखिल सखे, रिषभ शिरसाठ, हिमांशु बानोले, सत्यम किरकटे, उर्वी खडके, वैष्णवी राऊत आदींनी मोलाचे परिश्रम घेतले. कार्यक्रमाला अमरावतीतील रंगकर्मी, रसिक प्रेक्षक आणि पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *