आज अजितदादा आपल्यात नाहीत…:राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक, कार्यकर्त्यांना केले भावनिक आवाहन
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला 27 वर्षे पूर्ण होत असताना यंदाचा वर्धापन दिन मात्र वेगळ्याच भावनांनी भारलेला आहे. जानेवारी महिन्यात बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर पक्षाचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. त्यांच्या जाण्याने केवळ पक्षालाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला होता. कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, प्रत्येकाला आधार देणारे नेतृत्व हरपल्याची भावना आजही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये कायम आहे. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत दादांच्या स्मृतींना अभिवादन केले. “आज अजितदादा आपल्यात नाहीत, ही पोकळी प्रत्येक क्षणी जाणवते. मात्र त्यांनी जपलेला माणुसकीचा वारसा, विकासाचे राजकारण आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली बांधिलकी पुढे नेण्याचा निर्धार करूया,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर चालत अधिक सक्षम आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी नव्या जोमाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले. सुनेत्रा पवार यांची भावूक पोस्ट..
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष परिवारातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि हितचिंतकांना मनःपूर्वक शुभेच्छा! शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा तसेच स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेल्या सुसंस्कृत, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख राजकारणाच्या पायावर उभा राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपल्या यशस्वी प्रवासाची २७ वर्षे पूर्ण करत आहे. या प्रवासात असंख्य नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेने पक्षाला दिलेली साथ हीच आमची खरी ताकद राहिली आहे. पण यंदाचा वर्धापन दिन साजरा करताना मनात एक वेगळीच भावना दाटून येते. कारण आज आदरणीय अजित दादा आपल्यात नाहीत… सभागृहात भाषणं होतील, कार्यकर्त्यांचे मेळावे होतील, पक्षाचा झेंडा तितक्याच अभिमानानं फडकेल, पण प्रत्येक क्षणी एक पोकळी जाणवत राहील. दादा हे फक्त पक्षाचे नेते नव्हते, तर ते आधारवड होते. कार्यकर्त्यांच्या, सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात धावून जाणारे, संकटात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे, चूक झाली तर कान धरून समजावणारे आणि चांगलं काम केलं तर पाठीवर कौतुकाची थाप देणारे दादा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनले होते. त्यांनी जपलेला माणूस हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनी, दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करूया. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन आणि स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुरोगामी वाटेवर चालून अधिक सक्षम, समृद्ध आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी नव्या जोमानं काम करण्याचा संकल्प करूया.” मोदींनी नेहरूंचा विक्रम मोडला:सर्वाधिक दिवस सलग निवडून आलेले पंतप्रधान; मोदींच्या 12 वर्षांच्या कामाचे 12 चॅप्टर नरेंद्र मोदी यांनी निवडून आलेले पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरू यांना मागे टाकले आहे. नेहरू निवडणूक जिंकून 4398 दिवस पंतप्रधान होते. मोदींचा पंतप्रधान म्हणून आज त्याहून एक दिवस जास्त म्हणजे 4399 वा दिवस आहे. तथापि, नेहरू 1947 ते 1952 पर्यंतही पंतप्रधान होते, परंतु त्यावेळी निवडणुका झाल्या नव्हत्या, म्हणजेच ते निवडून आलेले पंतप्रधान नव्हते. तेही जोडल्यास नेहरूंचा एकूण कार्यकाळ 6131 दिवसांचा होईल. सविस्तर वाचा
