विधान परिषद निवडणूक:भाजपवर टीकास्त्र साेडणारे शिंदेसेनेचे माजी मंत्री सत्तार चर्चेसाठी मुंबईमध्ये दाखल

0
orig_new-project-2026-05-22t115529324_1780449351.jpg




विधान परिषद निवडणुकीत महायुतीत छत्रपती संभाजीनगर, पुण्यासह ९ ठिकाणी पक्षांतर्गत बंडाळी झाली. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणनीती आखली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात बंडोबांशी महायुतीतील दुसऱ्या फळीतील नेते बोलणी करतील. त्यांनाही बंडोबांनी जुमानले नाही तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रत्येक बंडोबाला ‘कानमंत्र’ देतील. दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत, भाजपने शिवसेनेचे मुंडके छाटले, असे आरोप करून पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आलेले शिंदेसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार मंगळवारी रात्री मुंबईत पोहोचले. ते आधी शिंदेसेनेच्या काही मंत्र्यांशी बोलतील. बुधवारी एकनाथ शिंदे आणि त्यानंतर गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांना भेटतील, अशी चर्चा आहे. दरम्यान, पुण्यात भाजपचे बंडखोर प्रदीप कंद यांना शांत करण्याची जबाबदारी आमदार राहुल कुल यांच्यावर देण्यात आली आहे. अमरावतीत शिवसेनेचे माजी आमदार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान बाद झाला. या निर्णयाविरुद्ध ते हायकोर्टात दाद मागणार आहेत. कोकणात शिंदेसेनेतील अंतर्गत गटबाजी उघड रायगड-सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात अजित पवार गटाचे अनिकेत तटकरेंना शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावलेंच्या मुलाने पाठिंबा दिला. त्यामुळे शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी संतप्त झाले. ‘स्वार्थापोटी केलेली तडजोड’ अशी टीका त्यांनी केली आहे. त्यांच्याशी मंत्री उदय सामंत चर्चा करतील. चंद्रपूर मतदारसंघात महायुती समर्थक सुधीर कोठारींची समजूत घालण्याची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना देण्यात आली आहे. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज अवैध, भाजपच्या राऊतांचा मार्ग सुकर सोलापूर | एकट्या भाजपकडे ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतदार असतानाही विधान परिषदेची निवडणूक लढण्याची तयारी काँग्रेसने केली होती. काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर केलेली सही माझी नसल्याचे प्रतिज्ञापत्र पंढरपूर नगरपालिकेतील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे गटनेते नागेश भोसले यांनी दिले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी फत्तेपूरकरांचा अर्ज अवैध ठरवला. यामुळे भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *