गांधी ग्राम येथे कावड पालखीसाठी रॅम्पची रुंदी वाढणार:रेलींगची सुविधा, शिवभक्त, जिल्हाधिकारी, पाेलिस अधीक्षकांकडून संयुक्त पाहणी‎

0
240_17804066656a1ed989cdff8_02kawad.jpg



यंदा होणाऱ्या कावड व पालखी उत्सवाच्या पृष्ठभूमीवर मंगळवारी सार्वजनिक कावड व पालखी उत्सव समिती, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, महसूल विभागाने गांधी ग्राम येथील पूर्णा नदीवरील सुविध

.

रस्ते, पायऱ्यांची रेलिंग, विद्युत पुरवठ्याची व्यवस्था करा {प्रत्यक्ष घाटात आणि नदीपात्रात उतरून पाहणी करण्यात आली. येणाऱ्या श्रावण मासात उद्भवणाऱ्या समस्येची चर्चा करून अपूर्ण पुल, तुटलेला घाट, अरुंद रस्ता, पायऱ्याची रेलींग लायटींग ची व्यवस्था ह्यावर तोडगा काढून कामे अधिकऱ्यांकडून देण्यात आले. {नॅशनल हायवे अॅथोरीटी चे अधिकारी हे यांनी गतिशिलतेने काम करावे जेणेकरून शिवभक्तांना इजा होणार नाही. कामांअभावी दुर्घटना घडल्यास संबंधितावर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न होणार अखेरच्या श्रावण सोमवारच्या पूर्वसंध्येला अकोल्यापासून १५ कि.मी. अंतर गांधीग्रामकडे शिवभक्त निघतात. रात्रभर कावडमध्ये पूर्णा नदीचे पाणी भरतात. पहाटेच अकोल्याकडे पुन्हा निघतात. शिवभक्त सकाळी राजेश्वर नगरीत पोहोचल्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ होतो. रात्री मिरवणुकीचा समारोप होतो. त्यामुळे हा एकाप्रकाराचा विक्रम असून, यंदा गीनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी नोंदणी करण्यात येणार असून, यासाठी शुल्कही शिवभक्तच भरणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *