नांदेडचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. प्रकाश टोम्पे यांचे दुःखद निधन
नांदेड (प्रतिनिधी) -शहरातील ज्येष्ठ विधीज्ञ, माजी अध्यक्ष अभिवक्ता संघ नांदेड तथा कायदे क्षेत्रातील अभ्यासू आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व ॲड.प्रकाश टोम्पे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने विधी क्षेत्रासह सामाजिक, शैक्षणिक आणि विविध स्तरांवर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ॲड. टोम्पे यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत वकिली व्यवसायात उल्लेखनीय कार्य केले. अभिवक्ता संघ नांदेडचे अध्यक्ष म्हणून त्यांनी संघटनेच्या बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. न्यायव्यवस्थेप्रती असलेली त्यांची निष्ठा, अभ्यासू वृत्ती आणि सहकाऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यामुळे त्यांना विधी क्षेत्रात विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले होते.
त्यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यातील वकील बांधवांनी एक अनुभवी मार्गदर्शक गमावल्याची भावना व्यक्त केली आहे. अनेक न्यायालयीन लढ्यांमध्ये त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या साध्या, संयमी आणि सेवाभावी स्वभावामुळे ते सर्वांच्या आदरास पात्र ठरले होते.
ॲड. प्रकाश टोम्पे यांच्या पार्थिवावर आज, सोमवार दि. १ जून २०२६ रोजी रात्री १०.३० वाजता नांदेड येथील गोवर्धन घाट परिसरातील शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
Post Views: 153
