javed jaffrey wife habiba fraud case update bmc assistant commissioner suspended

0
cover-placecover-marathi-3_1780909241.jpg


मुंबई2 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेते जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांची तब्बल 16 कोटी 24 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या फरार असल्याची माहिती आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, वांद्रे परिसरातील एका पुनर्विकास प्रकल्पात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास भाग पाडल्याचा आरोप महेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आहे. या प्रकल्पातून मोठा आर्थिक फायदा होईल, तसेच काही वर्षांत प्रकल्प पूर्ण होऊन गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते. यासाठी कथितरित्या बनावट कागदपत्रे, नकाशे आणि व्यावसायिक करार दाखवून विश्वास संपादन करण्यात आला.

जावेदला तीन मुले आहेत.

जावेदला तीन मुले आहेत.

काय आहे प्रकरण? तक्रारीनुसार, 2024 मध्ये मालमत्तेशी संबंधित एका प्रकरणातून हबीबा जाफरी यांची ओळख महेश पाटील यांच्याशी झाली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःला प्रकल्पाशी संबंधित प्रभावशाली व्यक्ती म्हणून सादर करत गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला. प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवला गेला असून भविष्यात व्यावसायिक उत्पन्न मिळणार असल्याचे सांगण्यात आले. या आश्वासनांवर विश्वास ठेवून हबीबा जाफरी यांनी स्वतःच्या मालमत्ता विकून मोठी रक्कम गुंतवल्याचा आरोप आहे.

दरम्यान, या व्यवहारातील निधी विविध खासगी कंपन्यांच्या खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके काम करत आहेत. या प्रकरणात यापूर्वीच एका संशयिताला अटक करण्यात आली असून आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे तपासले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *