नाशिक विधान परिषद निवडणूक:जागावाटपाआधीच भाजपकडून गणेश गितेंचा अर्ज दाखल, शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता, निवडणुकीत रंगत

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-31t10_1780203696.jpg




विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र, भाजपचे गणेश गिते यांनी शनिवारी पक्षाचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ नसतानाही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने युतीमधील तणाव वाढला आहे. शिंदे गटाकडून विजय करंजकर आणि ठाकरे गटाकडून माजी आमदार अनिल कदम यांनीही अर्जांची खरेदी केल्याने निवडणुकीतील रंगत शिगेला पोहोचली आहे. सेनेने माजी आमदार नरेंद्र दराडे यांना रिंगणात उतरवण्याची तयारी करून त्यांच्या प्रचारालाही सुरुवात केली. मात्र, भाजपनेही या जागेवर प्रबळ दावा ठोकला आहे. या राजकीय साठमारीत गणेश गिते यांनी शनिवारी भाजपच्या 9 नगरसेवकांच्या सूचक स्वाक्षऱ्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म जोडलेला नाही. पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारीचा शब्द मिळाला आहे, पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. मैत्रीत फुटीची चर्चा बोरा यांच्या अनुपस्थितीमुळे दोघा मित्रांमध्ये दरार निर्माण झाल्याचे बोलले जात असले तरी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल अस बोरा सांगत असले तरी दोघांनी अपक्ष अर्ज घेतल्याने ऐन वेळेस अपक्ष उमेदवारीची शक्यता नाकारता येत नाही. कांदे यांच्यासह कदम, करंजकरांची एन्ट्री भाजपच्या आक्रमक भूमिकेनंतर शिवसेनेनेही दबावतंत्र सुरू ठेवले. दराडे यांच्या पाठोपाठ आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुमन कांदे यांनी उमेदवारीवर दावा केलेला असताना उपनेते विजय करंजकर यांनीही अर्ज घेतल्याने तेही स्पर्धेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबरोबरच पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, उपनेते अजय बोरस्ते यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीतही ठाकरे गटाकडून (उबाठा) शुक्रवारी वसंत गिते यांनी अर्ज घेतला होता, तर शनिवारी माजी आमदार अनिल कदम यांनीही अर्ज घेतल्याने तेही रिंगणात उतरले आहेत. यांनी घेतले उमेदवारी अर्ज अनिकेत विजय पाटील भाजप (2)
संजय गिते अपक्ष (1)
बापू विश्वनाथ पिंगळे भाजप (2)
मंगेश खैरनार अपक्ष (1)
विजय किसन करंजकरशिवसेना (1)
अनिल साहेबराव कदम(उबाठा) (2)
गोकुळ बबन गिते अपक्ष (2) बोरांची अनुपस्थिती चर्चेत भाजपमध्येही उमेदवारीवरून सुप्त संघर्ष पाहायला मिळत आहे. गितेंसह नीलेश बोरा यांनीही भाजपकडून उमेदवारी अर्ज घेतला आहे. मात्र, शनिवारी गितेंचा अर्ज दाखल होत असताना बोरांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. याबाबत बोलताना गिते यांनी सावध पवित्रा घेत, जागा भाजपला सुटल्यास दोघांमध्ये ठरवून कोणी निवडणूक लढवायची हे ठरेल,असे स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *