नव्या पंपांमुळे कन्नडचा पाणीपुरवठा सुरळीत:नगरपालिका कर्मचाऱ्यांनी अंबाडी धरणावर रात्रभर जागून बसवले विद्युत पंप‎

0
240_17801449306a1adb22e51a0_kannad1111.jpg




कन्नड शहराला अंबाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जात असून, अत्यल्प जलसाठ्यामुळे विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरसेवक अब्दुल जावेद यांनी कर्मचाऱ्यांसोबत रात्रभर पाण्यात उभे राहून नवे विद्युत पंप बसवून घेतले आहेत. त्यामुळे आता कन्नडचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. कन्नड शहराला अंबाडी प्रकल्पातून ग्रॅव्हिटीद्वारे पाणीपुरवठा होतो. मात्र, या प्रकल्पात सध्या केवळ ११ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. पाण्याची पातळी खालावल्याने जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचणाऱ्या पाण्याचे प्रमाण ४५ लाख लिटरवरून थेट २० ते २२ लाख लिटरवर आले होते. यामुळे शहरात १० ते १२ दिवस आड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. ही समस्या सोडवण्यासाठी नगरपरिषदेने २० हॉर्स पॉवरचे दोन नवे विद्युत पंप बसवण्याचा निर्णय घेतला. केवळ कर्मचाऱ्यांवर अवलंबून न राहता नगराध्यक्षा फरीन बेगम यांचे पती तथा माजी उपनगराध्यक्ष अब्दुल जावेद यांनी स्वतः कामाची सूत्रे हाती घेतली. २८ मे रोजी सकाळी ८ वाजता या कामाला सुरुवात झाली. भर उन्हात आणि त्यानंतर रात्रीच्या अंधारातही जावेद यांनी कर्मचाऱ्यांसोबत पाण्यात उतरून काम केले. दुसऱ्या दिवशी २९ मे रोजी पहाटे ५ वाजता, म्हणजेच सलग २१ तासांच्या परिश्रमानंतर ही मोहीम यशस्वी झाली. स्वतः स्टार्टर बसवणे, विद्युत पुरवठा तपासणे आणि पाईपलाईन जोडणीची तांत्रिक कामे पूर्ण केली. या मोहिमेत मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता राहुल करडे, पाणीपुरवठा अभियंता परदेशी, बाजीराव थोरात, सुनील भाले, ताईराम सपकाळ, नामदेव कोळी, शिवाजी गिरी, पठाण मामू, शुभम मगर, असद पवार, राजूभाऊ शेख यांनी परिश्रम घेतले. मनोज पवार, गोकुळ राठोड, डॉ. सदाशिव पाटील, पवन ठाकूर यांच्यासह अनेकांनी मोहिमेचे कौतूक केले. Ãअंबाडी धरणातून ग्रॅव्हिटीने पाणी येणे बंद झाल्यामुळे शहरावर संकट आले होते. नगरसेवक अब्दुल जावेद यांनी स्वतः पुढाकार घेऊन एका रात्रीत २० एचपीचे दोन पंप बसवले. ते तांत्रिक कामात निष्णात असल्याने त्यांनी स्वतः स्टार्टर, विद्युत यंत्रणा आणि पाईपलाईनची जोडणी केली. यामुळे आता शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे. – प्रकाश अग्रवाल, नगरसेवक, कन्नड कन्नड शहराला अंबाडी प्रकल्पातून ग्रॅव्हिटीद्वारे पाणीपुरवठा होतो. मात्र, या प्रकल्पात सध्या ११ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पातळी खालावल्याने जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचणाऱ्या पाण्याचे प्रमाण २२ लाख लिटरवर आले होते. यामुळे शहरात १० ते १२ दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येत होता. अंबाडी धरणात ११ टक्के पाणीसाठा शिल्लक २० एचपीचे दोन पंप बसवले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed