पंढरीत प्रथमच 580 कोटींच्या निधीतून होणार मंदिर कॉरिडॉर:एकूण 3993 कोटींचा निधी मंजूर, भूसंपादनासाठी 2026 कोटी तर शहर विकासासाठी 1967 कोटी

0
orig_new-project-2026-05-31t064235451_1780190026.jpg



वारकरी, भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन उज्जैनचे महाकाल, काशीच्या विश्वनाथ देवस्थानच्या धर्तीवर पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी प्रथमच ३९९३ कोटी एवढ्या भव्य विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. २०२६ क

.

पंढरपूर शहर आणि परिसरात १९६७ कोटी रुपयांच्या निधीतून पंढरपूरचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. भूसंपादनानंतर केवळ ३० महिन्यांत विकास आराखड्यातील कामे पूर्ण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांना अद्ययावत सोयी देण्यासह त्यांच्या दर्शनाचा वेळ निम्म्याने कमी होणार आहे.

ग्लोबल स्पिरिच्युअल टुरिझम डेस्टिनेशन बनेल पंढरपूर

1 चार भव्य पार्किंग, ३ हेलिपॅड, २ नवीन पादचारी मार्ग आणि चंद्रभागेवरील स्कायवॉक यामुळे शहराची कोंडी कायमची फुटेल. तसेच २२ मुख्य रस्ते व २.२० किमीच्या नगर प्रदक्षिणा मार्गामुळे दळणवळण सुलभ होईल. 2 कॉरिडॉरमुळे पंढरपूर यात्रास्थळ न राहता, ग्लोबल स्पिरिच्युअल टुरिझम डेस्टिनेशन बनेल. वाढत्या भाविकांमुळे आणि त्यांच्या राहण्याच्या कालावधीत वाढ झाल्यामुळे हॉटेलिंग, ट्रान्सपोर्ट आणि स्थानिक बाजारपेठेत उलाढाल होईल. 3 पंढरपुरातील नदी घाटांचे सुशोभीकरण, स्वच्छतागृहे, ड्रेनेजलाइन यासोबतच १५ महापालिका शाळांच्या विकासामुळे स्थानिकांचे जीवनमान आणि पंढरपूर शहराचा नागरी स्तर मोठ्या प्रमाणात उंचवण्यास मदत होईल.

  • कॉरिडॉरमध्ये ६०० दुकानांसह मंदिर समितीची कार्यालये, वारकऱ्यांसाठी स्नानकुंड, तीन हेलिपॅडही
  • २.२० किमी लांबीचा नगर प्रदक्षिणा मार्ग १६२ कोटी
  • घाटांच्या सुशोभीकरणासह स्वच्छतागृहे २० कोटी
  • ड्रेनेजलाइनसाठी ०६ कोटी
  • वारकऱ्यांच्या निवासासाठी ५ पालखी तळ १०० कोटी
  • वारकऱ्यांसाठी स्नानकुंड बांधण्यासाठी १५० कोटी
  • २२ मुख्य रस्ते, ४ पुरातन इमारत नूतनीकरण ३०० कोटी आणि १५ पालिका शाळांचा विकास करणे
  • तीन हेलिपॅड, दोन नवे पादचारी मार्ग १०० कोटी
  • चार ठिकाणी पार्किंग व्यवस्था ६० कोटी
  • दोन पालखी मार्ग व वारकऱ्यांसाठी सुविधा १५० कोटी

पंढरीला बनवू जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र

मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून ही विकासकामे हाती घेतली आहेत. आराखड्यातील कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी ३० महिन्यांची मुदत निश्चित केली आहे. पहिले ६ महिने भूसंपादन, पुढील ४ महिने जागा रिकामी करणे आणि उर्वरित १८ महिन्यांत बांधकाम पूर्ण करणे. चंद्रभागा नदीवर स्कायवॉक आणि दगडी पुलाशेजारी नवीन पादचारी पुलामुळे गर्दी नियंत्रित करणे शक्य होईल. पुढील ५० वर्षांचा विचार करून तयार केलेला हा विकास आराखडा पंढरपूरला जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र बनवेल. – जयकुमार गोरे, पालकमंत्री, सोलापूर.

दहा सरकारी यंत्रणा सहभागी, सल्लागार एजन्सी महिनाभरात

पंढरपूर विकास आराखड्यासाठी पुढील महिन्यात सल्लागार संस्था नियुक्त केली जाणार आहे. ही एजन्सी प्रकल्पाच्या तांत्रिक बाजू सांभाळणार असून त्यानंतर प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल. या प्रकल्पात एकूण १० सरकारी यंत्रणांचा सहभाग आहे. कामांनुसार प्रत्येकाकडे विशिष्ट जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. – कार्तिकेयन एस., जिल्हाधिकारी सोलापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed