पुणे विषारी दारू प्रकरण:गुलाबो गँगचा आक्रोश; पर्वती पायथा परिसरात बेकायदेशीर दारू विक्रीविरोधात महिलांचे आंदोलन

0
56960091-c357-4d43-81c8-482948738753_1780148933818.jpg




पुणे शहरातील विषारी दारू प्रकरणानंतर १५ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर, गुलाबो गँग आणि पायल तिवारी बिटिया फाउंडेशनने पर्वती पायथा परिसरात बेकायदेशीर दारू विक्रीविरोधात ‘हल्लाबोल’ आंदोलन केले. शनिवारी शनी मंदिराजवळील कथित दारू विक्री केंद्रासमोर झालेल्या या आंदोलनात महिलांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासन आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, विषारी दारूमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. यासोबतच, शहरातील सर्व बेकायदेशीर दारू गुत्ते आणि हातभट्ट्यांवर तातडीने कारवाई करून त्या बंद करण्याची मागणीही करण्यात आली. गुलाबो गँगच्या संगीता तिवारी यांनी दारू विक्रीशी संबंधित दोषींवर कठोर गुन्हे दाखल करून त्यांच्याविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. गुलाबो गँगच्या प्रतिनिधींनी सांगितले की, दारूमुळे महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत आणि अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत आहे. त्यांनी पोलिस प्रशासनाने विशेष मोहीम राबवून बेकायदेशीर दारू विक्रीचे जाळे उद्ध्वस्त करावे, अशी मागणी केली. या आंदोलनात सहभागी महिलांनी घोषणाबाजी करत दारू माफियांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ऑटोरिक्षा नोंदणी ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन ज्या अर्जदारांनी ऑटोरिक्षा परवान्यासाठी इरादापत्र घेतले आहे परंतू इरादापत्राची मुदत संपलेली आहे, अशा अर्जदारांनी ३० जून पर्यंत ऑटोरिक्षा खरेदी करून वाहन नोंदणीची कार्यवाही पूर्ण करून घ्यावी. दिनांक १ जुलै नंतर या वाहनांची नोंदणी होणार नाही याची. नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, संगम ब्रिज, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed