मणीबाई हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी 'विकसित भारत बिल्डथॉन'मध्ये प्रथम क्रमांक पटकावला:अटल टिंकरिंग लॅब ठरली उपयुक्त, शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा

0
b87a8922-be06-4c02-a768-8e21620691c8_1779899502425.jpg




अमरावती येथील मणीबाई गुजराती हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींनी ‘केंद्र शासन पुरस्कृत विकसित भारत बिल्डथॉन २०२५’ स्पर्धेत जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या जीविका नलगे आणि रिया कांबे या विद्यार्थिनींनी हे यश संपादन केले. त्यांनी कठोर मेहनत, नावीन्यपूर्ण विचार आणि जिद्दीच्या जोरावर तंत्रज्ञान व कल्पकतेचा वापर करून ‘विकसित भारत’ संकल्पनेला बळ देणारा प्रकल्प सादर केला. या यशामागे शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली देव यांचे कार्यकुशल नेतृत्व आणि मार्गदर्शक शिक्षक राहुल देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी ही कामगिरी केली. ‘दी गुजराती एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष सुरेशभाई राजा यांनी संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने दोन्ही विद्यार्थिनींचे विशेष अभिनंदन केले. त्यांनी विद्यार्थिनींनी भविष्यातही राष्ट्रीय पातळीवर यशस्वी कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्याध्यापिका अंजली देव यांनीही विद्यार्थिनींचा सार्थ अभिमान व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशासाठी शाळेत उभारण्यात आलेल्या ‘अटल टिंकरिंग लॅब’ आणि ‘मिनी सायन्स सेंटर’चा मोठा वाटा आहे. याठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या अत्याधुनिक सुविधांचा योग्य उपयोग करून विद्यार्थिनींनी हे यश मिळवल्याचे कार्यकारिणी सदस्य परेशभाई राजा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed