MS Dhoni | MS धोनीला BCCI आणि लष्कराकडून पेन्शन किती मिळते? आकडा आला समोर!

0
CSK-vs-KKR-Siddhu-Slams-Dhoni.webp.webp


MS Dhoni | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) हा केवळ क्रिकेटमुळेच नव्हे तर देशसेवेशी असलेल्या नात्यामुळेही चर्चेत असतो. भारतीय प्रादेशिक सेना (Territorial Army) कडून त्याला मानद लेफ्टनंट कर्नल पद बहाल करण्यात आले होते. त्यामुळे अनेक चाहत्यांच्या मनात त्याला लष्कराकडून वेतन मिळते का आणि बीसीसीआय (BCCI) किती पेन्शन देते, याबाबत उत्सुकता निर्माण होते.

2011 मध्ये भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीला भारतीय प्रादेशिक सेना (Territorial Army) मध्ये ‘लेफ्टनंट कर्नल’ ही मानद पदवी देण्यात आली होती. भारतीय लष्करातील नियमित लेफ्टनंट कर्नल पदावरील अधिकाऱ्यांना दरमहा सुमारे 1.21 लाख ते 2.12 लाख रुपयांपर्यंत वेतन आणि विविध भत्ते मिळतात. मात्र धोनीला मिळालेली पदवी ही मानद स्वरूपाची असल्यामुळे त्याला नियमित अधिकाऱ्यांप्रमाणे मासिक वेतन किंवा आर्थिक लाभ मिळत नाहीत.

लष्कराच्या नियमांनुसार मानद पद धारण करणाऱ्या व्यक्तींना केवळ सन्मान म्हणून ही पदवी दिली जाते. धोनीनेही तरुणांमध्ये सैन्यदलाबद्दल आकर्षण वाढावे आणि देशसेवेची प्रेरणा मिळावी या उद्देशाने हे पद स्वीकारले आहे. मात्र तो जेव्हा सैन्याच्या प्रशिक्षणात किंवा अधिकृत ड्युटीमध्ये सहभागी होतो, तेव्हा त्याला सैन्यदलाच्या सर्व नियमांनुसार सुविधा आणि प्रोटोकॉल लागू होतात.

MS Dhoni | BCCI पेन्शनमधून दरमहा मिळते रक्कम :

माजी क्रिकेटपटूंच्या सन्मानासाठी बीसीसीआय (BCCI) कडून विशेष पेन्शन योजना राबवली जाते. 2022 मध्ये या योजनेत सुधारणा करून अनेक खेळाडूंच्या पेन्शन रकमेत वाढ करण्यात आली होती. नियमानुसार 25 किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळलेल्या पुरुष क्रिकेटपटूंना दरमहा 70 हजार रुपये पेन्शन दिली जाते.

धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द अत्यंत यशस्वी राहिली आहे. त्याने भारतासाठी 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 सामने खेळले आहेत. या कामगिरीमुळे तो बीसीसीआयच्या सर्वोच्च पेन्शन श्रेणीत येतो. त्यामुळे निवृत्तीनंतर त्याला दरमहा 70 हजार रुपयांची पेन्शन मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.

News title : MS Dhoni BCCI Pension

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed