वेरूळला अर्धा तास गारपीट अन् पाऊस:खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ
![]()
शहरासह तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याने हजेरी लावली. त्यानंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण परिसराला अक्षरशः झोडपून काढले. असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. शहरात काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या. या पावसामुळे बाजारपेठेत धावपळ उडाली होती.
वीटभट्टी चालकांनी मोठ्या प्रमाणावर कच्च्या विटा तयार करून त्या भाजणीसाठी व विक्रीसाठी रचून ठेवल्या होत्या. त्यांचे या पावसानेआर्थिक नुकसान झाले आहे. करमाड परिसरात सोमवारी दुपारपर्यंत कडक उन्हामुळे नागरिक उष्णतेने हैराण झाले होते. तापमानात मोठी वाढ झाल्याने बाजारपेठेसह सार्वजनिक ठिकाणी शुकशुकाट जाणवत होता. मात्र दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि मान्सूनपूर्व पावसाने झोडपले. काळे ढग दाटून येत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल पाऊण तास सुरू असलेल्या पावसामुळे करमाड शहरातील अनेक भागांत पाणी साचले. दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास आकाशातून गावरान बोराएवढ्या गारांचाही वर्षाव झाला. परिणामी, बाजारात तारांबळ उडाली होती. वेरूळ व परिसरात आज दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या काळ्या ढगांसह विजांच्या कडकडाटाला सुरुवात झाली आणि पाठोपाठ सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही भागात गारपीटही झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसामुळे संपूर्ण वेरूळ परिसर जलमय झाला. अचानक आलेल्या पावसामुळे वेरूळ लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक पर्यटकांनी लेणीच्या व्हरांड्यात व सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. गारपिटीमुळे लेणी परिसरातील वृक्षांच्या फांद्या तुटून पडल्या. लाडसावंगी | परिसरात आज रात्री अचानक हवामान बदलले. रात्री ८:२५ वाजता विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यात जोरदार पाऊस सुरू झाला. पावसाचा पहिला थेंब पडताच गावचा वीजपुरवठा खंडित झाला. संपूर्ण लाडसावंगी परिसरात अंधार पसरला. गेल्या काही दिवसांपासून नागरिक उकाड्याने हैराण होते. सव्वाआठच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पाऊस सुरू होताच काही सेकंदांत वीज गायब झाली. नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रात्री वीज गेल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशी स्थिती होते. खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळला. त्यातच सोसाट्याचा वारा आणि गाराही पडल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ झाली. वीजभट्टी चालकांचे मोठे नुकसान झाले. करमाड्च्या आठवडी बाजारात पाणी तुंबून ग्राहक, दुकानदारांची धावपळ उडाली. काही गावांमध्ये झाडेही पडली. पत्रे उडाली. पावसाचा जोर कायम राहिल्याने रस्त्यांवर पाणी साचले, तर अनेक ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले होते. वेरूळला अर्धा तास गारीपीट आणि पाऊस झाला.
